मी छोटा पण, कोरोना योद्धा मोठा..! बक्षिसाच्या रकमेतून बालकाने काय केले वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

मोहोळ येथील आदर्श तरुण मंडळाने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या संतांच्या वेशभूषा स्पर्धेत अर्णव माने याने संत तुकाराम महाराजांची वेशभूषा केली होती. त्याने या वेशभूषा स्पर्धेत एक हजार 111 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. कोरोना योद्धा होण्याचा अर्णवने हट्ट धरला. बक्षिसाची रक्कम अर्णवच्या हक्काची असल्याने हट्टानुसार मसले चौधरीत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करून आई-वडिलांनी त्याचा हट्ट पुरवला. 

नरखेड (सोलापूर) : मोहोळ येथील अर्णव माने याने वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पटकावलेल्या बक्षिसाच्या रकमेतून मामाच्या गावात मसले चौधरी येथे 70 कुटुंबांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत वाटप केल्या. लहान वयात कोरोना योद्धा होण्याची इच्छा बाळगून त्याने केलेल्या या कामगिरीमुळे ग्रामस्थांमध्ये त्याचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा : गुरुपौर्णिमा : मार्गदर्शकांच्या प्रेरणेमुळे त्यांचे जीवन नव्या आदर्शाने कसे घडले ते वाचा सविस्तर 

मोहोळ येथील आदर्श तरुण मंडळाने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या संतांच्या वेशभूषा स्पर्धेत अर्णव माने याने संत तुकाराम महाराजांची वेशभूषा केली होती. त्याने या वेशभूषा स्पर्धेत एक हजार 111 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. कोरोना योद्धा होण्याचा अर्णवने हट्ट धरला. बक्षिसाची रक्कम अर्णवच्या हक्काची असल्याने हट्टानुसार मसले चौधरीत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करून त्याने हट्ट पुरवला, असे त्याची आई शुभांगी व वडील श्रीनिवास माने यांनी सांगितले. 

हेही वाचा : पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप 

मसले चौधरी येथील एका कोरोना बाधिताचा शुक्रवारी मृत्यू झाला. परंतु मसले चौधरी हे अर्णवचे आजोळ आहे. येथील 70 कुटुंबांची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम या गोळ्या अर्णवने स्वत:च्या हाताने मोफत वाटप केल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी अर्णवचे व माने कुटुंबीयांचे आभार मानले. या वेळी श्रीनिवास माने, शुभांगी लंबे-माने. ज्ञानेश्वर लंबे, दीपक सिरसट, ज्ञानेश्वर सिरसट, ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

मी छोटा पण, कोरोना योद्धा मोठा..! 
मी कोरोनाच्या बाबतीत टीव्ही, मोबाईलवर व वृत्तपत्रात पाहतोय, वाचतोय. निष्पाप बळी गेल्याने खूप वाईट वाटतंय. पण मी तर लहानच ना! आता पहिलीला जातोय. परंतु मी ठरवलं, एकदा तरी कोरोना योद्धा व्हायचंच! आणि मला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून माझ्या मामाच्या गावात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटून कोरोना योद्धा झालोय, असे सहा वर्षाच्या अर्णवने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the prize money the child fulfilled his desire to become a Corona Warrior