esakal | विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा, पुणे पदवीधरसाठी 100 तर शिक्षकसाठी या 59 जणांचे अर्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

आज झाली छाननी, माघार घेण्यास मंगळवारपर्यंतची मुदत 
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली आहे. छाननीमध्ये वैध ठरलेल्या अर्जांपैकी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मंगळवारपर्यंतची (ता. 17) मुदत देण्यात आलेली आहे. पदवीधर आणि शिक्षकसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत याचे चित्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. 

विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा, पुणे पदवीधरसाठी 100 तर शिक्षकसाठी या 59 जणांचे अर्ज 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : नुकत्याच निकाल हाती आलेल्या बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली असताना आता विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील खरी लढत ही राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मानली जात आहे. या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांची उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहणार का?, ते या निवडणुकीत किती मते घेणार? त्यांच्या मतांचा फटका कोणाला बसणार? या शिवाय अन्य उमेदवारांचे काय भवितव्य असणार? कोणाचा फटका कोणाला बसणार? आणि कोणाचा फायदा कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिक्षक मतदारसंघातून कांग्रेसचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, या मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रेय सावंत, शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या सौभाग्यवती रेखा पाटील, खंडेराव जगदाळे या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत मानली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पाच जिल्हे, 58 तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना अवघ्या 12 ते 13 दिवसांचा कालावधी मिळत असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करू लागले आहेत. 

पदवीधरमधून अर्ज दाखल केलेले उमेदवार : 
सागर भिसे, अभिजीत बिचकुले, गणेश काकडे, विजयकुमार पाटील, कृपाल पलुसकर, निशा बिडवे, ऍड. महेश महामुलकर, ऍड. संतोष कामणे, सोमनाथ साळुंखे, सचिन खंडागळे, ज्योती ढमाले, प्रताप माने, शिवाजी खांडकर, युवराज पवार, शरद पाटील, संग्राम देशमुख, सचिन शिंदे, सुनील संकपाळ, मृत्युंजय शिंदे, ऍड. राजीव चव्हाण, सिद्धेश्वर होनराव, ऍड. कृष्णा पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे, धनंजय गोंडकर, योगेश ढगे, ऍड. रूपाली पाटील, शंकर पुजारी, ऍड. राजाराम पाटील, मनोजकुमार गायकवाड, बाळकृष्ण यमगर, भारत व्यवहारे, कपिलदेव कोळी, महारुद्र तिकुंडे, हेमंत जगताप, विजय लेंगरे, ऍड. बळवंत पोवार, कमर मोहम्मद हनीफ मुजावर, अरुण खरमाटे, लक्ष्मण चव्हाण, मिलिंद कांबळे, सुनील जाधव, अरविंद काळे, श्रीकांत चव्हाण, संजय मागाडे, गोवर्धन राजेशिर्के, अभिजीत शिंदे, महेश म्हस्के, अमोल पवार, मनोजकुमार गायकवाड, मानसिंग जगताप, अमर माने, सिताराम रणदिवे, राजेश पांडे, शिवाजी बंडगर, नितीन माने, मिलिंद कांबळे, शैलेश मोहिते, अरविंद कळकुटे, ऍड. रूपाली पाटील ठोंबरे, सतीश पाटील, जयंत पाटील, अर्चना देसाई, राजाराम चौधरी, तोहिद रफिक अहमद मुजावर, शरद लाड, संजय पवार, अभिजित साठे, प्रा. राजेंद्र खेडेकर, बसवराज हिरेमठ, दिपक चंदनशिवे, नीलकंठ खंदारे, राकेश कांबळे, नाथाजी चौगुले, प्रमोद पानसरे, गणेश काटकर, मनोज कांबळे, माणिक बनकर, अरुणकुमार लाड, वैभव जोशी, जयंत लंगडे, सुधाकर बोकेफोडे, रवींद्र मेढे, बापू चंदनशिवे, मुकुंद जाधवर, संग्राम देशमुख, निलकंठेश्वर वड्डे, संजय भगत, सुयोग भुजबळ, चंद्रकांत सावंत, प्रवीण पाटील, शाहिदअहमद पिरजादे, जयंत विभुते, हनिफा खान, आसिफ शेख, आदित्य बोरगे यांनी पुणे पदवीधरसाठी उमेदवारी दाखल केली आहे. 

शिक्षक मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले उमेदवार : 
जयंत आसगावकर, जितेंद्र पवार, रजनीश पिसे, सम्राट शिंदे, करणसिंह सरनोबत, दिलीप कचरे, सुनील मोरे, बाळासाहेब गोतर्णे, महादेव माने, राजेंद्र कुंभार, रेखा पाटील, सुरेश वाघमारे, मेहरु क्षेत्री, रेश्‍मा नलावडे, अनिल शितोळे, सचिन नागटिळक, शिवाजी मोरे, बाळासाहेब पाटील, तानाजी नाईक, दादासाहेब लाड, उमेश मुंडे, खंडेराव जगदाळे, सिताराम भैराळे, चाणक्‍यकुमार झा, सुधीर विसापुरे, शिवाजी बंडगर, नेमिनाथ बिरनाळे, नितीन पाटील, दत्तात्रेय सावंत, विजयानंद मानकर, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, नंदकिशोर गायकवाड, प्रा. प्रकाश पाटील, प्रकाश पवार, सर्जेराव जाधव, विशाल देवरे, संभाजीराव खोचरे, महादेव माने, राजेंद्र नागरगोजे, जयंत आसगावकर, सुजाता चौखडे-माळी, रूपाली बोचगेरी, सुभाष जाधव, सुरेश वाघमारे, रंजना सपकाळे, गोरखनाथ थोरात, सुनील मोरे, मुकुंद मोरे, सचिन नेहतराव, संतोष फाजगे, सत्यजित ज्ञानराव, रतन पाटील, रवींद्र सोलंकर, अभिजीत बिचकुले, डॉ. यासीन शेख, गोरखनाथ वेताळ यांनी उमेदवारी दाखल केली आहे.