सांगोल्यासाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल सुरू करा : पुरोगामी युवक संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी

दत्तात्रय खंडागळे
Monday, 14 September 2020

चालू वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे तेल्या रोगामुळे खूप नुकसान झाले असून, त्यासंदर्भात नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणीही संघटनेने केली. तसेच महिला बचत गट आणि फायनान्सकडून केली जाणारी सक्तीची वसुली थांबवणेही गरजेचे असल्याची मागणी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला येथील शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेच्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी इंदापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन सांगोला तालुक्‍यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेवेळी प्रामुख्याने सांगोला तालुक्‍यासाठी ऑक्‍सिजनयुक्त 100 बेडचे सुसज्ज असे आणि तज्ज्ञ स्वतंत्र डॉक्‍टरांची टीम असणारे हॉस्पिटल तातडीने सुरू करावे, अशी मागणी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. 

चालू वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे तेल्या रोगामुळे खूप नुकसान झाले असून, त्यासंदर्भात नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणीही संघटनेने केली. तसेच महिला बचत गट आणि फायनान्सकडून केली जाणारी सक्तीची वसुली थांबवणेही गरजेचे असल्याची मागणी पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. सांगण्यात आले. त्यास शासनाने मुदतवाढ दिलेली असतानाही बचत गटाचे आणि फायनान्सचे वसुली अधिकारी वसुलीसाठी त्रास देत असल्याचे पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्र्यांनी लगेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सांगोल्यात तातडीने कोव्हिड हॉस्पिटल सुरू कारण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. तसेच तेल्याग्रस्त डाळिंब पिकाचे पंचनामे करण्यास आणि कर्जाची वसुली थांबवण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. 

या वेळी पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष दीपक गोडसे, कार्याध्यक्ष ऍड. विशाल बाबर, ऍड. धनंजय मेटकरी, परमेश्वर कोळेकर, विष्णू देशमुख, अमोल खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purogami Yuvak Sanghatna Demands separate Covid Hospital for Sangola