अतिरिक्‍त पोलिस निरीक्षकांचा तिढा ! कोल्हापूर परिक्षेत्रात 21 अधिकारी अतिरिक्‍त 

तात्या लांडगे
Wednesday, 4 November 2020

'डीजी' कार्यालयास माहिती कळविली जाईल 
पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यात सोलापूर ग्रामीणसाठी पाच पोलिस निरीक्षक अतिरिक्‍त मिळाले आहेत. त्यांचे जॉईनिंग झाल्यानंतर ती माहिती पोलिस महासंचालक कार्यालयास कळविली जाईल. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार त्यांची नेमणूक केली जाणार आहे. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 

सोलापूर : गृह विभागाच्या माध्यमातून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या नुकतच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमधील बहुतांश पोलिस निरीक्षकांना इतरत्र बदली देण्यात आली आहे. तर काहींना त्याच जागेवर मुदतवाढ दिली आहे. परंतु, बदल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्‍त पोलिस निरीक्षकांची बदली केल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 

'डीजी' कार्यालयास माहिती कळविली जाईल 
पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यात सोलापूर ग्रामीणसाठी पाच पोलिस निरीक्षक अतिरिक्‍त मिळाले आहेत. त्यांचे जॉईनिंग झाल्यानंतर ती माहिती पोलिस महासंचालक कार्यालयास कळविली जाईल. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार त्यांची नेमणूक केली जाणार आहे. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण 

 

राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्या आहेत. त्यात तीन वर्षांहून अधिक काळ पूर्ण केलेल्यांसह विनंती बदल्या झालेल्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिस निरीक्षकांची 12 पदे रिक्‍त होती. त्यापैकी आठ अधिकारी बदलून जाणार आहेत. दुसरीकडे मात्र, बदलून येणारे 41 पोलिस निरीक्षक आहेत. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पाच, सोलापूर ग्रामीणमध्ये पाच आणि पुणे ग्रामीणमध्ये 11 पोलिस निरीक्षक अतिरिक्‍त झाले आहेत. अतिरक्‍त होत असलेले अधिकारी त्यांना हजर करुन न घेता त्यांची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयास कळवावे, असे पोलिस महासंचालक कर्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नोव्हेंबरअखेर काही पोलिस निरीक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे. त्यांनतर रिक्‍त झालेल्या जागांवर अतिरिक्‍त अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, दरवर्षीच्या अनुभवानुसार अतिरिक्‍त अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षाला नियुक्‍ती दिली जाते. यंदा मात्र, तसे न करता संबंधितांची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: questions off Extra police inspectors! Additional 21 officers in Kolhapur In the perimeter