मुकादमने मारली टांग, लॉकडाऊन भरला दम 

प्रशांत देशपांडे 
सोमवार, 6 एप्रिल 2020

काटेरी झाडे तोडून त्याच्यापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय आहे. अक्कलकोट रस्त्यावरील एका शेतात ते वास्तव्यास आहेत. त्यात 40 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. होटगी, मार्डी या ठिकाणी सुद्धा त्यांची काही माणसे सध्या अडकून पडली आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या हाताला काम नाही. तसेच त्यांचा मुकादम सुद्धा पळून गेल्याने जवळ असणारे पैसेसुद्धा आता संपल्याने त्यांच्यासमोर आता जगायचे कसे हा प्रश्‍न उभा राहिला आहे.

सोलापूर : काटेरी झाडे तोडून कोळसा करण्याचा आमचा व्यवसाय... महिन्यापासून काम बंद आहे... त्यात मुकादम पळून गेल्याने जवळचे पैसे संपले आहेत. मग जगायचे कसे असा प्रश्‍न रोहा (जि. रायगड) येथून कामाच्या शोधात आलेल्या कुटुंबीयांनी केला आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी फेब्रुवारीत रोहा येथून कामगार सोलापुरात आले आहेत. 

त्यांचा काटेरी झाडे तोडून त्याच्यापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय आहे. अक्कलकोट रस्त्यावरील एका शेतात ते वास्तव्यास आहेत. त्यात 40 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. होटगी, मार्डी या ठिकाणी सुद्धा त्यांची काही माणसे सध्या अडकून पडली आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या हाताला काम नाही. तसेच त्यांचा मुकादम सुद्धा पळून गेल्याने जवळ असणारे पैसेसुद्धा आता संपल्याने त्यांच्यासमोर आता जगायचे कसे हा प्रश्‍न उभा राहिला आहे. अक्कलकोट रस्त्यावरील एका शेतात पाच ते सहा कुटुंब सध्या वास्तव्यास आहेत. 
तसेच त्यांच्यासमवेत 10 ते 12 लहान मुले-मुली आहेत. त्यांना प्यायला दूधसुद्धा मिळत नसल्याने त्यांना दूध म्हणून पाणी पाजविण्यात येत आहे. त्यांच्या जवळीस पैसे संपले, तांदूळ संपला, गहू आणि इतर राशन देखील संपल्याने जगायचे कसे हा प्रश्‍न समोर उभा राहिला आहे. या लोकांना गावी परत जाण्यासाठी बाहेर देखील पडता येत नाही आहे. बाहेर पडले तर पोलिस काठ्या मारतात, या भीतीने बाहेर पडत नाहीत. मात्र, त्यांना सध्या दोन वेळेसचे अन्न देखील व्यवस्थित मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. आजपर्यंत एकाही शासनाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही. 

पैसे संपले आता जगायचे कसे 
ंआमच्या जवळचे पैसे संपले. आता जगायचे कसे असा प्रश्‍न आमच्या समोर उभा राहिला आहे. आमचे अजून काही बांधव मार्डी, होटगी या ठिकाणी सुद्धा अडकले आहेत. आजपर्यंत आम्हाला शासनाची मदत देखील मिळाली नाही. 
- रघुनाथ वाघमारे 

आमच्याकडचे अन्नधान्य देखील संपले आहे 
आमच्याकडे राहायला जागा देखील नाही. अंथरूण-पांघरूणसुद्धा नाही. जे काही आमच्याजवळ होते त्याच्यापासून आम्ही झोपडी तयार करून राहत आहेत. अन्नधान्य देखील संपले आहे. बाहेर जाता पण येत नाही ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. 
- सुलभा वाघमारे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Raigad workers in Solapur