esakal | अक्कलकोट तालुक्‍यातील बंधाऱ्यांत उजनीचे तर शेतातील बांधात पावसाचे पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Rain water in field obstructions in Akkalkot taluka

पेरणीची चिंता मिटली 
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले होते. आज अक्कलकोट तालुक्‍यातील काही भागात झालेल्या पावसामुळे शेतातील बांधात पाणी साठले असून सर्वत्र पाणी भरून वाहिल्याने पेरणीची चिंता मिटली आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यातील बंधाऱ्यांत उजनीचे तर शेतातील बांधात पावसाचे पाणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेला भीमा नदीवरचा आळगे (हिंगणे) बंधारा आज एका बाजूस उजनीच्या पाण्याने भरून वाहिला तर दुसऱ्या बाजूस मृगाच्या तासभर झालेल्या मुसळधार पावसाने आळगे व परिसरातील तीन-चार गावांतील शेतातील बांध पाण्याने भरून वाहिले. असा योग पेरणीच्या आरंभी आल्याने या भागातील नागरिक सुखावले आहेत. 
उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडले आहे. चिंचपूर आणि औज बंधारे पाण्याने पूर्ण भरल्याने पाणी पुढे गेले आहे. त्या पाण्याने आळगे बंधारा तीन मीटर प्लेट भरून आज पाणी खानापूरकडे मार्गस्थ झाले. तिथे दीड मीटर पाणी साठवून सीना नदीचे पाणी आता हिळ्ळी बंधाऱ्याकडे पुढे गेले आहे. वरच्या भागात पाऊस झाल्याने पाण्याच्या उपसा मंदावला आहे. त्यामुळे पाणी वेगाने खाली येत आहे. उद्या सकाळीपर्यंत हे पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. 
या पाण्याने शेतीसाठी, पिण्याचे पाण्याची सोय होणार आहे. दुसऱ्या बाजूस दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेला मृगाच्या पाऊस आज तालुक्‍यात भीमा नदीकाठी जोरदार बरसला. दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत दीड तास जोरदार हजेरी लावल्याने आळगे, अंकलगे, गुड्डेवाडी व खानापूर आदी भागात पाणीच पाणी झाले आहे. शेतातील बांधात पाणी साठले असून सर्वत्र पाणी भरून वाहिल्याने या भागात पेरणीची चिंता मिटली आहे. असाच मध्यम स्वरूपाचा पाऊस जेऊर, हंजगी आदी भागातही झाला. 

go to top