राजू शेट्‌टींचे ठाकरे सरकारबद्दल मोठ विधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पंढरपूर (सोलापूर) : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारवर मोठ विधान केले आहे. ते म्हणाले, भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकार देखील शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ठ झाले आहे. शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्ठात आणून बाजार समित्या हा राजकीय अड्डा बनवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा लाभ काही शेतकऱ्यानाच होणार आहे. त्यामुळे सरकारने थकबाकी बरोबरच चालू पिक कर्ज ही माफ करावे.

पंढरपूर (सोलापूर) : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारवर मोठ विधान केले आहे. ते म्हणाले, भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकार देखील शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ठ झाले आहे. शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्ठात आणून बाजार समित्या हा राजकीय अड्डा बनवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा लाभ काही शेतकऱ्यानाच होणार आहे. त्यामुळे सरकारने थकबाकी बरोबरच चालू पिक कर्ज ही माफ करावे. केंद्रातील भाजप सरकारने एमएसी बॅंकेतील घोट्याळ्याची ई़डी मार्फत चौकशी सुरु करावी.
 राज्यातील सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज ठाकरे जर शॅडो कॅबिनेट सारखी संकल्पना राबवत असती तर त्यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, नवनाथ माने, समाधान फाटे, अतुल कारंडे,रणजित बागल, विष्णूपंत बागल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदाभाऊ खोत फालतू माणूस....
सदाभाऊ खोत यांची सांगली जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडी घोटयाळा प्रकरणी ईडी मार्फत स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र,कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यातील हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. यातून एका शेतकर्यांने आत्महत्या केल्याचे ही समोर आले आहे. या प्रकरणी सरकाने गंभीर दखल घ्यावी. सदाभाऊ खोत हे केवळ सत्तेसाठी लाचार झाले आहेत. त्यांनी केलेली टीका मी फारसी मनावर घेत नाही. तो माणूस नसता फालतू असल्याचेही यावेळी शेट्टींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetti criticized Maharashtra government over APMC decesion