दिल्लीतील आरोपींच्या फाशीबद्दल समाधान; आता कोपर्डीच्या ताईला न्याय कधी?

अशोक मुरुमकर
शुक्रवार, 20 मार्च 2020

राजधानी दिल्लीत २०१२ मध्ये देशाला हदरुन सोडणारी घटना घडली होती. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. दोन महिन्यांत चारही आरोपींनी फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या सर्व मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे त्यांना फाशी कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण केला जात होता. अखेर शुक्रवारी त्यांना फाशी देण्यात आल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले आहे.

सोलापूर : राजधानी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना अखेर शुक्रवारी (ता. २०) पहाटे फाशी देण्यात आली. याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोलापूर शहर व जिल्ह्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणात एकूण सहा आरोपी दोषी ठरले होते. त्यातील एक अज्ञान होता. त्यामुळं त्याला सुधारगृहात ठेवून शिक्षा पूर्ण करावी लागली, तर प्रकरणातील मुख्य आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. उर्वरीत चार आरोपींना आज पहाटे साडे पाच वाजता तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आलं. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्याचे समाधान व्यक्त करतानाच महाराष्ट्रातील कोपर्डी घटनेबाबत त्या ताईला न्याय कधी असा प्रश्‍न केला जात आहे.

हेही वाचा : निर्भया खटला, जाणून घ्या कधी काय घडलं. वाचा सविस्तर बातमी.

राजधानी दिल्लीत २०१२ मध्ये देशाला हदरुन सोडणारी घटना घडली होती. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. दोन महिन्यांत चारही आरोपींनी फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या सर्व मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे त्यांना फाशी कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण केला जात होता. अखेर शुक्रवारी त्यांना फाशी देण्यात आल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले आहे. 
दिल्लीतील रस्त्यांवर चालत्या गाडीमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी असलेली तरुणी मित्रासोबत सिनेमा पाहून होस्टेलवर परतत असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. खासगी मिनी बसमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपींनी संबंधित तरुणी आणि मित्राला गाडीत घेतलं होतं. या फाशीबाबत सोशल मीडियावर सुद्धा समाधान व्यक्त केले जात आहे.

अभिशेष पाठणकर : यांनी म्हटले की, गेली सात वर्ष तीन महीने हे नराधाम जिवंत होते हेच मोठ दुर्दैव आहे. खरतर हा निकाल आधीच लागायला हवा होता. फाशीच्या शिक्षेने अशा नराधमांना खूप सोमा मृत्यू मिळाला. त्यांना वेदनादायी मृत्यू देईला हवा होता. निर्भयाला भावूर्ण श्रद्धांजली!

सुनिल पाटील : यांनी न्याय देवतेला सलाम केला आहे.
फिरोज पठाण : यांनी म्हटले की कोपर्डीच्या ताईला... असीफला न्याय कधी मिळेल.
सागर गायकवाड : यांनी म्हटले की, आज निर्भयाच्या आईला न्याय मिळाला आहे. आणि निर्भयाला पण शांती मिळाली असेल.
संगीता जाधव : यांनी म्हटले की अखेर न्याय मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of citizens of Solapur after the execution of the accused in Delhi