Gram Panchayat Election : माचणूरच्या सिद्धेश्वर आखाड्यात निवडणुकीची दंगल !

The riots of the Gram Panchayat elections in Machnur have become a matter of controversy and prestige
The riots of the Gram Panchayat elections in Machnur have become a matter of controversy and prestige
Updated on

ब्रह्मपुरी (सोलापूर) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर पावन नगरीतील तसेच तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या माचणूर (ता. मंगळवेढा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीची दंगल चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील माचणूर ग्रामपंचायत तीर्थक्षेत्र असल्यामुळे अधिक महत्त्व असून, राज्यभर प्रसिद्धीच्या झोतात आहे. तसेच अधिकाऱ्यांचे गाव म्हणूनही माचणूर गावाची ओळख आहे. 

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीस थोडा अवधी असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीतील गटास अधिक महत्त्व आले असून, मतदार संघातील राजकीय नेत्यांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत खेचून आणण्यास प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विधानसभेची बेरीज करण्याचे राजकीय गट प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. 

नऊ सदस्य संख्या असलेल्या माचणूर ग्रामपंचायत निवडणुकीची दंगल यावेळी अत्यंत चुरशीची बनली असून, सत्ता स्थापनेसाठी दोन्हीही गटांकडून दावा केला जात आहे. गेली १५ वर्षे या ग्रामपंचायतीची सत्ता सर्वांना सोबत घेऊन व गटा- तटाची मोट बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुनील डोके यांचे एकहाती वर्चस्व होते. आजपर्यंत गावामध्ये केलेली विकासकामे या जोरावर तसेच जाहीरनामा प्रत्येक प्रभाग, वाडी- वस्तीगाठी भेटी घेऊन प्रचारास सुरवात केली आहे. 

परंतु प्रथमच भालके गट व आवताडे गटात तुल्यबळ लढत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे. 9 सदस्य संख्या असलेल्या या निवडणुकीत दोन्ही गटांचे मिळून 18 व अपक्ष 2 असे 20 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रथमच या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी संघर्ष निर्माण झाला असून प्रत्येक गट उमेदवाराच्या खर्चाची तयारी, अर्ज दाखल करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंतची जबाबदारी करीत आहे. 

भालके गटाकडून सुनील डोके, धनंजय गायकवाड, विठ्ठल डोके, महादेव फराटे तर आवताडे गटाकडून राजीव बाबर, जनार्दन शिवशरण, आबासाहेब डोके, बबन सरवळे, विलास डोके, लिंबाजी डोके, काशिनाथ डोके या दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची बनली आहे. प्रत्येक निवडणुकीत एकतर्फी असणारी ही निवडणूक रंगली असून विजयासाठी दोन्हीही गटांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटास आवताडे गटाने एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. 

माचणूर गावचे उद्योजक जनार्दन शिवशरण यांनी आवताडे गटाकडून प्रभाग क्रमांक एकमधून पत्नीची उमेदवारी असल्यामुळे या प्रभागामध्ये जास्त लक्ष केंद्रित केली आहे. त्यामुळे दोन्हीही गटांकडून मतदारांशी संपर्क, प्रचार रॅली, वाड्या- वस्त्यांवर होम टू होम गाठीभेटी घेत विजयाचा दावा केला जात आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच तालुक्‍यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

आतापर्यंत ग्रामपंचायतमध्ये एकहाती कारभार चालवण्याऐवजी सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन गावाचा विकास करणे, व्यायामशाळा, तीर्थक्षेत्राकडे जाणारे बोगद्याचे काम, मिनरल वॉटर प्लांट, वाडी- वस्तीवरील रस्ते, पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्राला अधिक महत्त्व देऊन राज्यभर नावलौकिक करणार आहोत. 
- राजीव बाबर, संचालक, दामाजी शुगर, आवताडे गट प्रमुख 

आतापर्यंत आम्ही गावाचा विकास केला असून, यापुढे तीर्थक्षेत्रासाठी भक्त निवास, देवस्थानाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर आदी विकासकामे पुढील काळात करणार आहोत. 
- सुनील डोके, भालके गट प्रमुख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com