
मोहोळ तालुक्यात (ता.14 व 15 ऑक्टोबर) रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे सिना, भिमा या नद्यांना पूर आले तर विविध बंधारे पाण्याने भरून वाहू लागले. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या विविध पिकासह फळबागा नाहीशा झाल्या. बागायत जमिनी खरडून गेल्या, तर जनावरे वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. दोन दिवसात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.
मोहोळ (सोलापूर ) : मोहोळ तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या नुकसानी पोटी शासनाकडून प्राप्त झालेले २१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी आयडीबीआय बँकेत पाठविल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील नुकसानीचा 45 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला आहे.
हे ही वाचा : सहकारमहर्षीचे एका महिन्यात 2.25 लाख पोती साखरेचे तर 1.25 कोटी युनिट विजेचे उत्पादन !
मोहोळ तालुक्यात (ता.14 व 15 ऑक्टोबर) रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे सिना, भिमा या नद्यांना पूर आले तर विविध बंधारे पाण्याने भरून वाहू लागले. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या विविध पिकासह फळबागा नाहीशा झाल्या. बागायत जमिनी खरडून गेल्या, तर जनावरे वाहून गेली. अनेक घरात पाणी शिरले. दोन दिवसात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.
हे ही वाचा : मंद्रूपमध्ये अवैध वाळूप्रकरणी सहा जणास पोलिस कोठडी
दरम्यान, तहसीलदार बनसोडे यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी यांची पथके नेमून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पुराची व अतिवृष्टीची सुमारे 45 गावांना झळ बसली. दरम्यान शासनाला अहवाल सादर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात २१ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. नदी काठच्या सर्वात जास्त नुकसान झालेल्या गावांना प्राधान्य देत अगोदर त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
अशी आहे रकमेची वर्गवारी
शेती नुकसानी साठी - 17 कोटी
मृत जनावरासाठी - 1 कोटी 90 लाख
जामिनी वाहून गेल्यासाठी - 32 लाख 82 हजार
घरांच्या पडझडीसाठी- 69 लाख 64 हजार
घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीसाठी - 80 लाख 35 हजार
अशी आहेत गावे
देगाव, पवारवाडी, घोरपडी, एकुरके, बोपले, नरखेड डिकसळ, पासलेवाडी, खरकटणे, दाईगडेवाडी, घाटणे, अर्धनारी, अरबळी, घोडेश्वर, तरटगाव, मलिकपेठ, मसले चौधरी, गलंदवाडी, बिटले, शिरापुर (मो), रामहिंगणी, कोळेगाव, वडवळ, विरवडे, मुंडेवाडी, चिंचोली काटी, पीरटाकळी, कामती खुर्द, खंडोबाचीवाडी, नांदगाव, हिंगणी(नि), ढोकबाबुळगाव, कोंबडवाडी, कुरणवाडी (अ), येणकी, देवडी, नालबंदवाडी, नांदगाव, आष्टे, शिरापुर (सो), लांबोटी, पोफळी ही 44 गावे आहेत. दरम्यान दुसऱ्या टप्यातील नुकसान भरपाईची रक्कम कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले