काम होत नसल्याचा संताप ! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचे पतीसह झोन कार्यालयात ठिय्या आंदोलन

Agitation
Agitation
Updated on

सोलापूर : विडी उद्योगात काम करत आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मोदी लाटेत महापालिकेवर भाजपची सत्ता आली आणि त्यात आम्हाला जनतेने नगरसेवकाची संधी दिली. परिसरातील नागरिकांच्या समस्या आम्ही सोडवू, पाण्याचा प्रश्‍न सुटेल, अशी आश्‍वासने निवडणुकीपूर्वी दिली. मात्र, चार वर्षांत आश्‍वासनांची पूर्तता अद्याप झाली नसल्याने नाराजीचा सूर निघू लागला आहे. सभागृहात स्पष्टपणे बोलता येत नाही, निवेदनाच्या माध्यमातून प्रश्‍न सुटतील, असे वाटले. परंतु, दोन वर्षांपासून निवेदने देऊनही ना पाण्याची समस्या सुटली, ना ड्रेनेजची कामे झाली. या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्र. 17 च्या नगरसेविका जुगुनबाई अंबुवाले यांनी पतीसह झोन कार्यालय आठमध्ये आज ठिय्या मांडला. 

शहरातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी 20 लाखांचा तर हद्दवाढ भागातील नगरसेवकांना प्रत्येकी 30 लाखांचा निधी देण्याचा ठराव महापालिकेने केला. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सभागृहात दबक्‍या आवाजात बोलणारे पडद्यामागील नगरसेवकही आता निधीसाठी आक्रमक होऊ लागले आहेत. त्यामुळे निधीसंबंधीच्या प्रत्येक विषयावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आता सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करू लागले आहेत. सभागृहात अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या नगरसेवकांचीच कामे तत्काळ केली जातात, असा आरोप अंबुवाले यांनी केला आहे. नळ बाजार परिसरात ड्रेनेज लाइन तुंबल्याने रस्त्यावर पाणी येत आहे. त्या परिसरातील नागरिकाचा विवाह असल्याने दोन महिन्यांपासून विभागीय कार्यालय आठकडे निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली. मात्र, अद्याप ते काम झालेले नाही, असेही अंबुवाले यांनी यावेळी सांगितले. शास्त्री नगर, मुर्गीनाला, आडके हॉस्पिटल आणि कामगार चौक या परिसरातील काही भागात अद्याप ड्रेनेज झालेले नाही, असेही अंबुवाले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शाळा क्र. 14 ची जीवघेणी इमारत 
प्रभाग क्र. 17 मध्ये महापालिकेची शाळा क्र. 14 ची इमारत धोकादायक बनली आहे. बांधकाम जीर्ण झाले असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिकविले जात आहे. त्या ठिकाणी डागडुजी करावी, बांधकाम दुरुस्ती करावी, अशी मागणी यापूर्वी महापालिकेकडे केली आहे. मात्र, अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. प्रभागातील नगरसेवकांनी सांगितलेली कामे केली जात नाहीत. दुसरीकडे मात्र, मोठ्या प्रमाणावर बिले काढली जातात, याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी नगरसेविका अंबुवाले यांनी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
A demand has been made to provide five new MSRTC buses to the Mangalwedha ST Depot to improve passenger services.
How will B-2 land regularization benefit Solapur?
Marathi News Esakal
www.esakal.com