ग्रामीण पोलिसांनी जप्त केला 35 लाख 26 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल 

crime new.jpg
crime new.jpg

सोलापूरः मंगळवेढा येथील संजय आवताडे यांच्या दागिने चोरी प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून 35 लाख 26 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल एका संशयिताकडून जप्त केला आहे. 
ता. 10 जानेवारी रोजी संजय आवताडे रा. खंडोबा गल्ली मंगळवेढा यांच्या नवीन घराची वास्तूशांतीचे कार्यक्रम असल्याने यातील विनायक माधवराव यादव ( वय 41 वर्षे ), रा. मारापूर ता. मंगळवेढा हे सहकुटुंब आले होते. त्याच दिवषी आवताडे यांचे घरी, तामदर्डी ता. मंगळवेढा येथील रंगसिध्द देवाची पालखी आली होती. यातील आवताडे हे नातेवाईक कार्यक्रमाकरीता आल्यानंतर घरी थांबले होते. वास्तूशांतीच्या कार्यक्रमाकरीता आलेले नातेवाईक व घरातील व्यक्‍ती हे हॉलमध्ये जमले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवकार्य असल्याने सोबत आणलेली बॅग व इतर साहित्य आहे त्या परिस्थितीत सोडून खालच्या हॉलमध्ये आरतीसाठी गेले. घरातील देवकार्य संपल्यानंत आवताडे आल्यानंतर त्यांनी आणलेल्या बॅगेची चैन उघडी दिसली, बॅग पाहिली असता बॅगेतील सोन्याचे दागिन्यांचे पाकीट आढळून आले नाही. सर्वत्र शोधले असता कुठेही आढळून आले नाही. सदरचे बॅगेतील पाकीट हे चोरीस गेले असल्याची त्यांची खात्री झाली, तसेच त्यांचे नातेवाईक संजय महादेव आवताडे यांनी त्यांचेही काही सोने चोरीस गेले असल्याचे समजले म्हणून यातील विनायक यादव यांच्या सांगण्यावरुन मंगळवेढा पोलिस ठाणे येथे ता. 12 जानेवारी 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथक आरोपीच्या मागावर होते. 
गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हयाच्या घटनास्थळी एल.सी.बी. च्या पथकाने भेट देवून सदर ठिकाणचे व्हिडिओ शुटिंग व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा याची तपासणी केली. त्यावरून एक अनोळखी संशयित इसम हा त्यादिवशी घरामध्ये वावरत असल्याचे दिसले. सदर गुन्हयात संशयिताकडून एकूण 859 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन व रोख रक्कम 10 हजार 160 रूपये असा एकूण 35 लाख 26 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कारवाईकरीता मंगळवेढा पोलिस ठाणे यांचे ताब्यात दिले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गुंजवटे मंगळवेढा पोलिस ठाणे हे करीत आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल असून तसेच मंगळवेढा पोलिस ठाणे येथे वाळू चोरीचे व दारू बंदी कायदयाखाली गुन्हे दाखल आहेत. 
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, उपनिरीक्षक खाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गुंजवटे व त्यांच्या पथकाने केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com