सकल मराठा समाज आंदोलन : सोमवारी "येथील' प्रत्येक घरावर फडकणार भगवा ध्वज !

शांतिलाल काशीद 
Thursday, 17 September 2020

साकत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत रणनीती ठरविण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यामध्ये सोमवार, 21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या जिल्हा बंदला पाठिंबा देणे, गाव पातळीवर कडकडीत बंद पाळणे, जिल्हा व तालुका समितीच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देणे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा पुढे सुरू ठेवणे तसेच 21 सप्टेंबरला घरोघरी भगवे झेंडे लावण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

मळेगाव (सोलापूर) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात बैठका व आंदोलनांना सुरवात झाली आहे. मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी "एक मराठा लाख मराठा'चा नारा देत बार्शी तालुक्‍यातील साकत येथे बैठक पार पडली. त्यानुसार सोमवार, 21 सप्टेंबर रोजी साकत येथे कडकडीत बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात येणार आहे. तसेच शौर्य व बलिदानाचे प्रतीक असणारा भगवा ध्वज प्रत्येक घरावर फडकवला जाणार आहे. याबाबत साकत येथील मराठा समाजाच्या वतीने सरपंच शोभा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. 

साकत येथील ज्योतिर्लिंग मंदिरात बुधवारी (ता. 16) सायंकाळी सात वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत रणनीती ठरविण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यामध्ये सोमवार, 21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या जिल्हा बंदला पाठिंबा देणे, गाव पातळीवर कडकडीत बंद पाळणे, जिल्हा व तालुका समितीच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देणे, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आरक्षणाचा लढा पुढे सुरू ठेवणे तसेच 21 सप्टेंबरला घरोघरी भगवे झेंडे लावण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. 

या बैठकीत सूरज मोरे व मनोज मोरे यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी साकत येथील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The saffron flag will be hoisted on every house in Sakat on Monday