esakal | #Coronavirus : बापरे.. बाईकवरील तरुणांकडून पोलिसांप्रमाणे लाठीचार्ज! 
sakal

बोलून बातमी शोधा

#Coronavirus : बापरे.. बाईकवरील तरुणांकडून पोलिसांप्रमाणे लाठीचार्ज! 

काही टवाळखोर तरुण पोलिसांप्रमाणे बाईकवरून फिरत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्या तरुणांनी अनेक नागरिकांना पोलिसांप्रमाणे लाठीचार्ज केला. नागरिकांनी घाबरून पळ काढला. संशय आल्यानंतर आम्ही दोघा तरुणांना अडविले. दम देऊन चौकशी केल्यानंतर एका हवालदाराकडून काठी आणल्याचे टवाळखोर तरुणाने सांगितले. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ संशयित तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. काठ्याही जप्त केल्या. 
- दत्ता सणके, 
सदस्य, शांतता कमिटी 

#Coronavirus : बापरे.. बाईकवरील तरुणांकडून पोलिसांप्रमाणे लाठीचार्ज! 

sakal_logo
By
परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संचारबंदीच्या कालावधीत रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून सुरू असलेला लाठीचार्ज सर्वांना माहिती आहेच..! काही तरुण अजूनही बाईकवरून जॉय राईड करताना दिसून येत आहेत. आकाशवाणी परिसरात तर काही टवाळखोर तरुण पोलिसांप्रमाणे गस्त घालत असून, नागरिकांना काठीने मारहाण करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

आकाशवाणी परिसरातील भाग्यलक्ष्मी नगर, भीमाशंकर नगर, शांती नगर, स्वागत नगर, बसवेश्‍वर नगर, आशा नगर, कलावती नगर, विनायक नगर, शिवशक्ती चौक या परिसरात बाईकवरील टवाळखोर तरुणांनी पोलिसांप्रमाणे गस्त घालून नागरिकांना मारहाण केल्याची तक्रार परिसरातील शांतता कमिटीच्या सदस्यांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन संबंधित टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना सहकाऱ्यांना दिल्या. पोलिसांच्या पथकाने टवाळखोरांना शोधून काढले आणि त्यांच्यावर कारवाई केली. 

शांतता कमिटीचे सदस्य दत्ता सणके म्हणाले, "आमच्या परिसरात अशाप्रकारे बाईकवरून चौघे तरुण फिरत होते. घराबाहेर येऊन थांबलेल्या नागरिकांना टवाळखोर हातातल्या काठीने मारहाण करत होते. लोकांना पळवून लावत होते. ते टवाळखोर तरुण पोलिसांप्रमाणे फिरत असल्याने सुरवातीला कोणालाही शंका आली नाही. नंतर मात्र हा प्रकार वाढल्याने आम्ही पोलिसांकडे तक्रार केली.' 

काही टवाळखोर तरुण पोलिसांप्रमाणे बाईकवरून फिरत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्या तरुणांनी अनेक नागरिकांना पोलिसांप्रमाणे लाठीचार्ज केला. नागरिकांनी घाबरून पळ काढला. संशय आल्यानंतर आम्ही दोघा तरुणांना अडविले. दम देऊन चौकशी केल्यानंतर एका हवालदाराकडून काठी आणल्याचे टवाळखोर तरुणाने सांगितले. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ संशयित तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. काठ्याही जप्त केल्या. 
- दत्ता सणके, 
सदस्य, शांतता कमिटी 

-- 
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाईकवरून फिरणारे तरुण टवाळखोर नव्हते. ते तरुण पोलिस मित्र होते. त्या दिवशी बॅरिकेड आणण्यासाठी तरुण निघाले होते. त्या तरुणांकडून असा प्रकार घडला नाही. 
- सूर्यकांत पाटील, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे