सहस्त्रार्जून नागरी पतपेढीच्या अध्यक्षपदी संजीव रंगरेज यांची निवड़ 

sanjiv rangrej.jpg
sanjiv rangrej.jpg
Updated on

सोलापूरः येथील सहस्त्रार्जून नागरी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी संजीव वसंतसा रंगरेज तर उपाध्यक्षपदी किशोर नारायणसा बसुदे यांची निवड करण्यात आली आहे. 

येथील सहस्त्रार्जून नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची सभा मावळते अध्यक्ष विश्‍वनाथ निरंजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी चेअरमन पदासाठी संजीव रंगरेज यांचे ननाव चंदन चव्हाण यांनी सुचवले. त्यास गिरीश कोल्हापूरे यांनी अनुमोदन दिले. त्यांची निवड बिनविरोध झाली. तसेच व्हाईस चेअरमनपदी किशोर बसुदे यांच्या निवडीकरीता रंगानात बंकापूर यांनी नाव सुचवले. त्यास पद्मा विनायक विठ्ठल यांनी अनुमोदन दिले. 

या सभेसाठी संस्थेचे संचालक विट्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सचिव अनिल रंगरेज, सो.स.क्षत्रिय समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पवार आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर व सेवा मंडळाचे सहसचिव महेश मेंगजी यांनी शुभेच्छा देणारी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन रंगनाथसा बंकापूर तर संचालक चंदन चव्हाण यांनी आभार मानले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com