सर्जा- राजाचे योग्य उपचार व निगा ठेवण्यासाठी चाळीस गावांमध्ये घडवले जागरुकतेचे दर्शन !

pola.jpg
pola.jpg
Updated on

सोलापूर ः आज बैलपोळ्याचा सण साजरा होत असताना उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चाळीस गावाममध्ये शेतकरी आता बैलपोळ्याला बैलांचे शिंग तासणे, शिंगाना रंग लावणे यातून बैलाच्या संभाव्य कर्करोगाला टाळण्यासाटी हे प्रयत्न केले जात आहेत. आजारी बैलांना उपचार न करता तसेच कामाला जुंपण्याचे प्रमाण जागरुकतेमुळे कमी झाले आहेत. 

सर्वसाधारणपणे बैलाला कोणता आजार झाल्यास त्याला डॉक्‍टरला न दाखवता तसेच कामाला जुंपण्याचे प्रकार होत असतात. या उलट दुभत्या जनावरांना मात्र दुध उत्पादन बंद पडेल या भितीने उपचाराची घाई केली जाते. हा प्रकार टाळण्यासाठी दक्षिण व उत्तर सोलापूर तालक्‍यात बैलांच्या मोफत उपचाराचे काम केले जाते. मागील काही वर्षापासून या कामामुळे हिपळे, वडजी, इंगळगी, आलेगाव, वांगी, पाथरी, गुळवंची, एकरुख, करडगाव, ओवळे, वडदबाळ, बेलाटी या सारख्या चाळीस गावामध्ये बैलांचे उपचार व निगा राखण्याबाबत मोठी जागरुकता शेतकऱ्यांमध्ये आली आहे. 

विशेषतः बैल पोळा सण आला की शेतकरी बैलांना सजवण्याचे काम करतात. त्यासाठी बैलांची शिंगे तासली जातात. शिंगांना ऑईल पेंट लावला जातो. खिल्लार बैलांमध्ये या प्रकाराने शिंगाचा कर्करोग वाढत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. या तालुक्‍यामध्ये बैलांना कर्करोगाचे दोन प्रकार आढळतात त्यामध्ये प्रामुख्याने शिंग व डोळ्याचा कर्करोग हे दोन प्रकार अधिक आढळतात. ऑईल पेंट शिंगांना लावल्याने त्यातील रसायनाचा परिणाम हे कर्करोगाचे कारण मानले जाते. शिंग तासणे देखील प्रकार बैलांची नैसर्गिक स्थितीला बिघडवण्याचा प्रकार आहे. या बाबी सातत्याने शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनातून बिंबवण्यात आल्या. त्यामुळे आता या गावामध्ये जागरुक शेतकरी शिंग तासणे व ऑईल पेंटने रंगवणे हे प्रकार टाळत आहेत. तसेच बैलाच्या अंगाला पिवळी माती लावण्याचे प्रकार देखील चुकीचे असून त्या एैवजी रिबन व रंगीत झुलीची परंपरा अधिक उत्तम असल्याने ती पाळली जाते. 


बैलाची काळजी अशी घ्यावी 
- रंगाचा वापर सजावटीसाठी नसावा 
- बैल आजारी पडल्यास काम थांबवून आधी उपचार करावेत 
- बैलाला दोन्ही बाजूने दोरी बांधणे चुकीचे 
- बैलासाठी पिण्याच्या पाण्याचा हौद स्वच्छ असावा 


बैलाची डोळसपणे निगा व्हावी 
परिसरातील चाळीस गावामध्ये बैलांच्या आरोग्याबद्दल मोठे काम केले जात आहे. शेतकरी आता बैलाच्या बद्दल डोळसपणे निगा व उपचारात लक्ष देत आहेत 
- डॉ.आकाश जाधव, पशुवैद्यकीय तज्ञ, ऍनिमल राहत संस्था 

कामापेक्षा आधी उपचार 
बैलांवर आजार झाल्यावर त्याला कामावर पुन्हा न जुंपता आधी उपचार करावेत ही भूमिका शेतकऱ्यांना पटू लागली आहे. तसेच शिंग तासणे व शिंगांना ऑईल पेंट लावण्याचे प्रकार कमी होऊ लागले आहेत. 
- डॉ. राजेश चित्तोडा, पशुवैद्यकीय तज्ञ, ऍनिमल राहत संस्था सोलापूर. 

बैलाची काळजी घेणे शिकलो 
आमच्या गावात होत असलेल्या प्रबोधनामुळे मागील पाच वर्षापासून बैलाची निगा शास्त्रीय पध्दतीने कशी राखावी या कडे मी लक्ष देतो. अनेक प्रकारच्या नव्या गोष्टी बैलांच्या बाबतीत आता समजू लागल्या आहेत. 
- गणेश घोडके, शेतकरी भोगाव.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com