
या वेळी झालेल्या सोडतीत मागील 23 ग्रामपंचायतींचे आरक्षण राखीव नसल्यामुळे त्यातील 10 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव ठेवण्यात आल्या. तर नव्याने झालेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर या ग्रामपंचायतीचे आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाले तर 21 ओबीसी आरक्षणामधील 11 जागा चिठ्ठीद्वारे निश्चित झाल्या. उर्वरित 48 जागांमधील 18 जागा महिलांसाठी केल्या तर 6 जागा चिठ्ठीद्वारे निश्चित केल्या.
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यामध्ये 10 जागा मागासवर्गीयांसाठी, 21 जागा इतर मागास वर्गासाठी तर 48 जागा या सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. मनासारखे आरक्षण न झाल्याने काहींनी सोडतीतून माघारी जाणे पसंत केले.
या वेळी झालेल्या सोडतीत मागील 23 ग्रामपंचायतींचे आरक्षण राखीव नसल्यामुळे त्यातील 10 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव ठेवण्यात आल्या. तर नव्याने झालेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर या ग्रामपंचायतीचे आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाले तर 21 ओबीसी आरक्षणामधील 11 जागा चिठ्ठीद्वारे निश्चित झाल्या. उर्वरित 48 जागांमधील 18 जागा महिलांसाठी केल्या तर 6 जागा चिठ्ठीद्वारे निश्चित केल्या. तालुक्यातील लक्षवेधक झालेल्या बोरोळे, नंदेश्वर ,सिद्धापूर महिला राखीव तर भोसे ओबीसी, सलगर बु., हुलजंती सर्वसाधारणसाठी राहिले. या वेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, महसूल नायब तहसीदार साळुंके, निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे, महावीर माळी, इलियास चौधरी आदी उपस्थित होते.
गाव आरक्षण पुढीलप्रमाणे...
संपादन : श्रीनिवास दुध्याल