महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून निवडी जाहीर
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने राज्यातील शहर व जिल्हाध्यक्षपदी नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. सोलापूर कॉंग्रेसतर्फे सोशल मिडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी तिरुपती परकीपांडला यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने नव्या पदाधिकाऱ्यांची यादी सोशल मिडियावर जाहीर केली आहे.
सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आगामी महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने शहर व जिल्हाध्यक्षपदी सोशल मिडियासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून निवडी जाहीर
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने राज्यातील शहर व जिल्हाध्यक्षपदी नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. सोलापूर कॉंग्रेसतर्फे सोशल मिडियाच्या जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी तिरुपती परकीपांडला यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने नव्या पदाधिकाऱ्यांची यादी सोशल मिडियावर जाहीर केली आहे.
मागील काही वर्षांपासून प्रकाश पाटील यांच्याकडे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद असून प्रकाश वाले यांच्याकडे साधारपणे अडीच वर्षांपासून शहराध्यक्षपद आहे. प्रकाश वाले यांच्या तुलनेत प्रकाश पाटील यांची कामगिरी दिसून आली नाही. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या तुलनेत आपलीही ताकद वाढावी, या हेतूने सोशल मिडियातून अधिक प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या निवडी जाहीर झाल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची गावागावांमधील व शहरांमधील ताकद वाढावी म्हणून सर्वच जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. राज्यभरात 48 जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडी जाहीर करण्यापूर्वी संभाव्य जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविण्यात आल्याचीही चर्चा आहे.