शाळा सुन्यासुन्या, मैदाने पडली ओस; पालक व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची लागली आस 

School
School

केत्तूर (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्वच शाळा सुन्यासुन्या पडल्या आहेत. तर शाळेची मैदाने विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्याचे दिसून येत आहेत. दरवर्षी 15 जूनच्या आसपास शाळा भरत असतात. परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या संकटामुळे 22 मार्चपासून बंद असलेल्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. 

नुकताच इयत्ता बारावीचा निकाल लागलेला आहे. परंतु इयत्ता दहावीचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील, हा मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता आणि ऑनलाइन शिक्षण सुरूही झाले आहे. परंतु या ऑनलाइन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची दाट शक्‍यता आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पुस्तके ज्ञानाची भर घातली जाईल; परंतु विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि कसरती खेळांचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) जवळ आलेला असताना मैदानात भरवल्या जाणाऱ्या कवायती आणि मैदानात खेळणारी खो-खो, कबड्डी, क्रिकेट आणि इतर खेळ हे पूर्णतः बंद असल्याने सर्व शाळांची मैदाने ओस पडल्याचे चित्र आहे. 

केत्तूर (ता. करमाळा) येथील पालक सचिन खराडे म्हणाले, शाळा विद्येचे मंदिर असते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे शिक्षणच योग्य आहे. हसत-खेळत विद्यार्थी आपल्या सवंगड्यांबरोबर अभ्यास करू शकतात, मात्र एकलकोंडे ठेवणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह चुकीचाच आहे. 

पालक विलास सोनवणे म्हणाले, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक खेळही महत्त्वाचे आहेत. परंतु शाळाच बंद असल्याने विद्यार्थी वरचेवर आळशी बनत चालले आहेत. त्यातच मोबाईलवरील ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com