अकरावी प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी प्रसिद्ध : भारती विद्यापीठ 93.80 तर एडी जोशी 92 टक्‍क्‍यांवर क्‍लोज

प्रमोद बोडके 
Tuesday, 1 September 2020

वालचंद कला महाविद्यालयाच्या अनुदानित तुकडीची यादी 90.80 टक्‍क्‍यांवर तर याच महाविद्यालयातील विनाअनुदानित शाखेची यादी 88.60 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. संगमेश्‍वर महाविद्यालयाची यादी 88 टक्‍क्‍यांवर तर दयानंद महाविद्यालयाची यादी 89.60 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. 

सोलापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सोमवारी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून दुसऱ्या यादीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. भारती विद्यापीठ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची दुसरी यादी खुल्या वर्गासाठी 93.80 टक्‍क्‍यांवर तर ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाची खुल्या वर्गासाठीची गुणवत्ता यादी 92 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. 

हेही वाचा : Big Breaking ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर गुन्हा दाखल 

वालचंद कला महाविद्यालयाच्या अनुदानित तुकडीची यादी 90.80 टक्‍क्‍यांवर तर याच महाविद्यालयातील विनाअनुदानित शाखेची यादी 88.60 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. संगमेश्‍वर महाविद्यालयाची यादी 88 टक्‍क्‍यांवर तर दयानंद महाविद्यालयाची यादी 89.60 टक्‍क्‍यांवर क्‍लोज झाली आहे. भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जातीसाठी 91.6, एसटीसाठी 88.20, ओबीसीसाठी 89.80, एसबीसीसाठी 89.0, व्हीजे-ए-साठी 92.20, एनटी-बी-साठी 90.40 टक्‍क्‍यांवर गुणवत्ता यादी क्‍लोज झाली आहे. ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये खुल्या संवर्गासाठी 92 टक्के, एसटीसाठी 83.40, ओबीसीसाठी 84.0, एसबीसीसाठी 89.20, एसईबीसीसाठी 85.40, व्हीजे-ए-साठी 84.20, एनटी-बी-साठी 74.60 तर एनटी-सी-साठी 90 टक्‍क्‍यांवर दुसरी गुणवत्ता यादी क्‍लोज झाली आहे. 

हेही वाचा : सोलापूरकरांना आजपासून भरावा लागणार नवा कर! सत्ताधाऱ्यांवर टीका करीत "यांनी' केला विरोध 

टेक्‍निकल हायस्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू 
महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला नॉर्थकोट टेक्‍निकल हायस्कूल येथे इयत्ता अकरावी द्विलक्षीय अभ्यासक्रमासाठी (विज्ञानसह तांत्रिक विषय मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्‍ट्रिकल मेंटेनन्स) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावीनंतर बीए प्रथम वर्ष, अभियांत्रिकी डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्षाला तसेच बीएस्सी., बी. बी. ए., बी. सी. एस. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. एचएससी व्होकेशनल (किमान कौशल्य) अभ्यासक्रमात मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, इलेक्‍ट्रिकल टेक्‍नॉलॉजी, कन्स्ट्रक्‍शन्स टेक्‍नॉलॉजीसाठी प्रवेश सुरू आहेत. बारावीनंतर (किमान कौशल्य) अभियांत्रिकी डिप्लोमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. कला शाखेतही प्रवेश घेता येतो. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. डी. शिंदे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The second merit list of the eleventh admission process was announced