प्रवाशांसाठी खुशखबर ! रेल्वेने फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांना दिली मुदतवाढ 

विजय थोरात 
Tuesday, 19 January 2021

रेल्वे प्रशासनाने सण - उत्सवांनिमित्त 20 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 यानंतर जानेवारी - 2021 दरम्यान विशेष फेस्टिव्हल एक्‍स्प्रेस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. या फेस्टिव्हल गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या गाड्यांच्या अवधीमध्ये वाढ करण्यात येत आहे. 

सोलापूर : सर्व देशभर कोरोना साथीच्या आजारामुळे रेल्वे विभागाकडून यात्री सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर विशेष यात्री एक्‍स्प्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रेल्वे प्रशासनाने सण - उत्सवांनिमित्त 20 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 यानंतर जानेवारी - 2021 दरम्यान विशेष फेस्टिव्हल एक्‍स्प्रेस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. या फेस्टिव्हल गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या गाड्यांच्या अवधीमध्ये वाढ करण्यात येत आहे. 

गाडीमधील थांब्यात, मार्ग आणि गाड्यांच्या सेवेचे दिवस यामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. या सर्व गाड्यांचे डबे आरक्षित आहेत. तरी सर्व प्रवासी नागरिकांना विनंती आहे, की विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा व बदल झालेल्या गाड्यांच्या वेळा लक्षात ठेवून आपला प्रवास सुनिश्‍चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

या गाड्यांच्या अवधीमध्ये झाली वाढ 

  • गाडी क्र. 06502 यंशवतपूर-अहमदाबाद विशेष एक्‍स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक रविवारी 28 मार्च 2021 पर्यंत धावणार आहे. 
  • गाडी क्र. 06501 अहमदाबाद-यंशवतपूर विशेष एक्‍स्प्रेस आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी 30 मार्च 2021 पर्यंत धावणार आहे. 
  • गाडी क्र. 07319 हुबळी-हैदराबाद फेस्टिव्हल विशेष गाडी प्रतिदिन हुबळी स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. गाडी क्र. 07320 हैदराबाद-हुबळी फेस्टिव्हल विशेष प्रतिदिन हैदराबाद स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 1 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 07323 हुबळी- वाराणसी फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून एकदा) प्रत्येक शुक्रवारी हुबळी स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 26 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 07324 वाराणसी-हुबळी फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून एकदा) प्रत्येक रविवारी वाराणसी स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 28 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 06521 यशवंतपूर- जयपूर सुविधा फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून एकदा) प्रत्येक गुरुवारी यंशवतपूर स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 25 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 06522 जयपूर-यंशवतपूर सुविधा फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून एकदा) प्रत्येक शनिवारी जयपूर स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 27 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 06229 म्हैसूर-वाराणसी फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून दोनदा) प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी म्हैसूर स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 30 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 
  • गाडी क्र. 062130 वाराणसी-म्हैसूर फेस्टिव्हल विशेष (आठवड्यातून दोनदा) प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी वाराणसी स्थानकाहून निघेल. या गाडीचा अवधी 1 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing the growing response from the passengers the Railways extended the festival special trains