अबब! राज्यात 30 हजार रूग्ण; रेड व ऑरेंज झोनमधील अधिकारी म्हणाले... "लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करा नाहीतर"...

तात्या लांडगे
शनिवार, 16 मे 2020

राज्यातील ग्रीन, ऑरेंजमधील जिल्ह्यांत घट
पहिल्या लॉकडाऊनवेळी (22 मार्च रोजी) संपूर्ण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 होती. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात 12, पुणे महापालिका परिसरात 15, मुंबईत 24, नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई या ठिकाणी प्रत्येकी चार, नगर जिल्ह्यात दोन तर पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद व रत्नागिरी या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. आता चौथ्या लॉकडाउनपूर्वी राज्यातील रुग्णसंख्या 29 हजार 100 झाली असून मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनाने सरकारला कळविले आहे.

सोलापूर : मागील 14 दिवसांत तब्बल 17 हजार 594 रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, आता पावसाळा तोंडावर असून राज्यातील मागील काही दिवसांपासून रुग्णांचा वाढणारा आलेख चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनच्या शिथिलतेचा गांभीर्याने विचार करावा, असे म्हणणे रेड झोनमधील जिल्हा व महापालिका प्रशासनाने सरकारला कळविले आहे.
1 मे रोजी वर्धा, गडचिरोली हे दोन जिल्हे ग्रीन झोनमध्ये तर भंडारा, गोंदिया, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार व कोल्हापूर हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये होते. तर चंद्रपूर, नांदेड ग्रामीण व लातूर महापालिकेचा परिसर ग्रीन झोनमध्ये होता. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, धुळे, नाशिक या जिल्ह्यांतील ग्रामीण भाग ऑरेंज झोनमध्ये तर जळगाव, उल्हासनगर महापालिकेचा परिसरही ऑरेंज झोनमध्ये होता. मात्र, 15 मे पर्यंत परिस्थिती खूपच बदलली असून आता फक्त राज्यातील सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, बीड, वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशिम व चंद्रपूर हे नऊ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर गडचिरोली हा एकमेव जिल्हा ग्रीन झोनमध्ये राहिला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले, तरीही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करताना परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा सोलापूर, पुणे, मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

aschim-maharashtra-news/solapur" target="_blank">सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • ठळक बाबी....
  • - आतापर्यंत राज्यातील 2 लाख 50 हजार 436 व्यक्तींच्या कोरोना टेस्ट; त्यासाठी तब्बल 113 कोटींचा झाला खर्च
  • - कोरोनामुळे रुग्ण सापडल्याने राज्यातील एक हजार 473 परिसर प्रतिबंधित (कन्टेमेंट); जिल्हा व महापालिका प्रशासनाने दिली राज्य सरकारला सद्यस्थितीची माहिती
  • - राज्यात मागील पंधरा दिवसात वाढले तब्बल 17 हजार 594 रुग्ण; दररोज सरासरी तेराशे रुग्णांची भर; सोलापूर, पुणे, मुंबईसह अन्य महापालिका परिसरातील रुग्ण वाढीचा वाढला वेग
  • - राज्यातील नऊ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे ग्रीन झोनमध्ये; एक हजार 68 व्यक्तींचा आतापर्यंत कोरोनामुळे झाला मृत्यू; आतपर्यंत बरे झाले सहा हजार 564 रुग्ण
  • - मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, कल्याण-डोंबिवली, पुणे, सोलापूरसह औरंगाबाद, अकोला व नागपूर महापालिका परिसरात रुग्ण वाढीचा वेग अधिक; मीरा-भाईंदर, वसई-विरार, अमरावती, पनवेल, पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात तर सातारा, रायगड, नाशिक, पुणे, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांतील वाढत्या रुग्णांकडेही लक्ष देण्याची गरज
  • - प्रतिबंधित क्षेत्रातून अन्य परिसरात जाण्यास तेथील नागरिकांना बंदी असतानाही अनेकजण करीत आहेत नियमांचे उल्लंघन; राज्यातील तब्बल 10 हजारांहून अधिक व्यक्तींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत गुन्हे
  • - राज्यात तब्बल तीन लाख 29 हजार तीनशे दोन व्यक्ती आहेत होम क्वारंटाईन; 16 हजार 306 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन; दररोज सरासरी साडेसहा हजार संशयित व्यक्तींची दररोज होतेय कोरोना टेस्ट

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seriously consider the relaxation of the lockdown