पंढरपूर तालुक्‍यात आज आढळले कोरोनाचे सात रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील दोन, गणेश नगर जवळील येळे वस्ती येथील एक, मोहोळ तालुक्‍यातून पंढरपुरात बंदोबस्तासाठी आलेला एक पोलीस कर्मचारी आणि मूळचा मंगळवेढा तालुक्‍यातील असलेला एक श्री विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. सुरक्षा कर्मचारी भक्तनिवास येथे राहण्यास आहे. 

पंढरपूर(सोलापूर): पंढरपूर शहरातील पाच आणि तालुक्‍यातील दोन अशा सात व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्‍यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 22 झाली आहे. याशिवाय 124 व्यक्तींचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर एकनाथ बोधले यांनी दिली. 

हेही वाचाः आधी ऍक्‍शन प्लॅन मग सोलापूरचा लॉकडाउन 

पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील दोन, गणेश नगर जवळील येळे वस्ती येथील एक, मोहोळ तालुक्‍यातून पंढरपुरात बंदोबस्तासाठी आलेला एक पोलीस कर्मचारी आणि मूळचा मंगळवेढा तालुक्‍यातील असलेला एक श्री विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. सुरक्षा कर्मचारी भक्तनिवास येथे राहण्यास आहे. 
याशिवाय करकंब आणि खर्डी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. करकंब येथील महिला उल्हासनगर येथून आलेली आहे तर खर्डी येथे आलेली महिला सांगोला तालुक्‍यातील वाकी शिवणे येथून आलेली आहे. शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात कोणत्या आणि किती व्यक्ती आल्या होत्या याविषयीची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven corona positive patients detected in pandharpur taluka