बालपणीचे दोघेही मित्र पण माव्यावरुन झाले भांडण ! चापट दिल्यानंतर जागेवरच सोडला जीव

तात्या लांडगे
Friday, 30 October 2020

शहरातील कुर्बान हुसेन नगरात राहणारे दोघेही मित्र आचारी (स्वयंपाकी) म्हणून काम करीत होते. गुरुवारी दोघेही काम संपावून घरी निघाले होते. मुर्तूज थोडी दारु पिला होता. दोघेही शानदार चौकातील भारत टिंबर दुकानासमोर आले. त्यांनी तिथून मावा घेतला. शकीलने मुर्तूजला मावा दिला. मात्र, त्याचवेळी मुर्तूजला शकीलने शिवीगाळ सुरु केली. त्याठिकाणी अनेकजण होते, शकीलला राग आला. त्या रागातून त्याने मित्र मुर्तूजला डाव्या गालावर चापट मारली. त्यात तो खाली पडला आणि बेशुध्द झाला.

सोलापूर : मुर्तूज आणि शकील दोघेही बालपणीचे मित्र. दोघेही लोकांची ऑर्डर आली की जेवण बनवून देण्याचा व्यवसाय करायचे. 23 वर्षांपर्यंतची त्यांची सोबत, एकमेकांसोबत वाढलेले, विवाहानंतर दोघांचाही संसार सुखाचा सुरु आहे. गुरुवारी (ता. 29) रात्री अकराच्या सुमारास दोघेही शानदार चौकात आले. त्यांनी एका दुकानातून मावा विकत घेतला. शकीलने मावा घेतला आणि मुर्तूजला दिला. मात्र, मुर्तूज दारु पिलेला होता, त्याने शकीलला चारचौघात शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून शकीलने मुर्तूजला चापट मारली. त्यात शकील खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

शहरातील कुर्बान हुसेन नगरात राहणारे दोघेही मित्र आचारी (स्वयंपाकी) म्हणून काम करीत होते. गुरुवारी दोघेही काम संपावून घरी निघाले होते. मुर्तूज थोडी दारु पिला होता. दोघेही शानदार चौकातील भारत टिंबर दुकानासमोर आले. त्यांनी तिथून मावा घेतला. शकीलने मुर्तूजला मावा दिला. मात्र, त्याचवेळी मुर्तूजला शकीलने शिवीगाळ सुरु केली. त्याठिकाणी अनेकजण होते, शकीलला राग आला. त्या रागातून त्याने मित्र मुर्तूजला डाव्या गालावर चापट मारली. त्यात तो खाली पडला आणि बेशुध्द झाला. त्यानंतर शकीलसह त्याठिकाणच्या लोकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मृत झाला होता. त्यानंतर सदर बझार पोलिस घटनास्थळी पोहचले. शकील शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने शकीलला उद्यापर्यंत (ता. 31) पोलिस कोठडी ठोठावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shakeel slapped Murtuza, keeping his anger in mind. Shakeel fell down and died on the spot