खंडणी मागणारा धाडसचा अध्यक्ष पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 25 जानेवारी 2020

कोरडा नदीतून वाळू उपसा करण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, सिद्धेश्‍वर यादव, अश्‍विनी यादव, कुबेर मंडले, मारुती मंडले, प्रदीप जाधव, लक्ष्मण कोळी, परशु कोळी यांच्यासह अज्ञात सहा ते आठ जणांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, सिद्धेश्‍वर यादव, कुबेर मंडले यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सांगोला (जि. सोलापूर) : कोरडा नदीतून वाळू उपसा करण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, सिद्धेश्‍वर यादव, अश्‍विनी यादव, कुबेर मंडले, मारुती मंडले, प्रदीप जाधव, लक्ष्मण कोळी, परशु कोळी यांच्यासह अज्ञात सहा ते आठ जणांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, सिद्धेश्‍वर यादव, कुबेर मंडले यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी, 1 जानेवारी रोजी सोनंद (ता. सांगोला) येथे धाडस संघटनेच्या शाखेचे उद्‌घाटन झाले होते. 8 जानेवारी रोजी सोनंद येथील धाडस संघटनेचे पदाधिकारी कुबेर मंडले, सिद्धेश्‍वर यादव यांनी फिर्यादी ऋषीराज सतीश बाबर व शहाजी काशीद यांना बोलावून घेत शरद कोळी यांच्या भाषणाचा आधार घेऊन तुम्हाला अध्यक्षांनी काय सांगितले समजत नाही का? अध्यक्षांच्या अंगावर किती सोने आहे माहिती आहे का, सगळ्या दोन नंबर धंद्याचे हप्ते गोळा करणे हे आमच्या संघटनेचे काम आहे, तुमच्याविरुद्ध तहसीलदारांना पुन्हा कारवाई करायला लावीन, तुम्हाला अध्यक्षांचे वजन माहिती नाही, महसूल खाते शरद कोळी यांना घाबरते, आपल्या गावात कोरडा नदीतून वाळूचा बेकायदेशीर धंदा चालू करून आमच्या संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांना आमच्यामार्फत दरमहा 50 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगितले. शरद कोळी यांना 50 हजार रुपये हप्ता दिला नाही तर तहसीलदारांना सांगून तुझ्यावर खोटी वाळू चोरीची कारवाई करायला लावू असा दम देत शरद कोळी यांच्या धाडस संघटनेच्या नावाने 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. 
दरम्यान, खंडणी दिली नाही म्हणून 23 जानेवारी रोजी सांगोला-सोनंद रस्त्यावरील यादव वस्तीजवळ धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी फिर्यादीला खंडणीची मागणी केली. या वेळी फिर्यादी ऋषीराज बाबर यांनी खंडणी देण्यास विरोध केल्याने प्रदीप जाधव आणि त्यांच्यासोबत आलेली आठ ते 10 मुले, सोनंद येथील धाडस संघटनेचे सिद्धेश्‍वर यादव, अश्‍विनी यादव, कुबेर मंडले, मारुती मंडले यांनी हाताने, लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

याबाबत ऋषीराज बाबर यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, सिद्धेश्‍वर यादव, अश्‍विनी यादव, कुबेर मंडले, मारुती मंडले, प्रदीप जाधव, लक्ष्मण कोळी, परशु कोळी यांच्यासह अज्ञात सहा ते आठ जणांवर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले तपास करीत आहेत. 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad koli arrested in sangola