धक्कादायक! फक्त बोकडाच्या जेवणासाठी आला नाही म्हणून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

यांच्यावर गुन्हा दाखल 
दिगंबर उत्तम वाघमारे, नारायण उत्तम वाघमारे, हरिदास उत्तम वाघमारे, श्रीधर माणिक वाघमारे आणि सचिन सदाशिव वाघमारे (सर्व रा. पळशी, ता. पंढरपूर) या पाच संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दिगंबर वाघमारे, नारायण वाघमारे आणि श्रीधर वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली असून पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : बोकडाच्या जेवणासाठी का आला नाही म्हणून चिडून एका तरूणास मारहाण करण्यात आली. या घटनेत सोमनाथ राजाराम मोरे (वय 28) याचा मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्‍यातील पळशी येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 

हेही वाचा - सोलापुरात भरधाव टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू 

घटनेची अधिक माहिती अशी, की पळशी येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर उत्तम वाघमारे हा मोटरसायकलवरून वसंत मोरे यांच्या घराबाहेर आला. आमच्याकडे जेवणासाठी बोलावलेले असताना तुम्ही का आला नाही, असे म्हणून दिगंबर वाघमारे यांनी वसंत मोरे व त्यांच्या या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यानंतर दिगंबर वाघमारे याने त्यांचे भाऊ नारायण, हरिदास, चुलत भाऊ श्रीधर वाघमारे यांना बोलून घेतले. फिर्यादी दत्तात्रय मोरे आणि वसंत मोरे हे दिगंबर याला समजावून सांगत असताना नारायण वाघमारे याने वसंत मोरे याला आणि दिगंबर याने दत्तात्रेय 
याला चापट मारली. भांडण सोडवण्यासाठी घरातील सुनिता राजाराम मोरे, छाया भारत मोरे आल्या असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. तेव्हा सोमनाथ राजाराम मोरे याने दिगंबर याला तुम्ही बायामाणसांना का मारता, अशी विचारणा केली. तेव्हा दिगंबर वाघमारे याने सोमनाथ यांच्या गळ्यास हाताने धरून त्याचे डोके भिंतीवर आपटले. या मारहाणीत सोमनाथ बेशुद्ध होऊन खाली पडला. दिगंबर वाघमारे आणि त्याच्या सोबत असणारे इतर भाऊ तेथून निघून गेले. 

हेही वाचा - सोलापूरकरांसाठी आनंददायी... उजनीतून सोडले पाणी 

मोरे कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेतील सोमनाथ याला भाळवणी येथील डॉ. खांडेकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यांनी पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तातडीने सोमनाथ यास पंढरपूर येथे नेण्यात आले. परंतु पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी दत्तात्रय माणिक मोरे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking murder as it didnt come for lunch