पंढरपूर तालुक्यात गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

पंढरपूर तालुक्यात भाळवणी येथे हा गोळीबार झाला आहे. यात बापू भागवत तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा गोळीबार कोणी केला याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत दिवसा ढवळया गोळीबार झाल्याने घबराट निर्माण झाली आहे.

पंढरपुर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यात दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. आर्थीक काणावरुन हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. मात्र याचे अद्याप कारण समलेले नाही. घटनास्थळावर पोलिस दाखल होत आहेत. त्यानंतर अधिकृत कारण समजणार आहे.
पंढरपूर तालुक्यात भाळवणी येथे हा गोळीबार झाला आहे. यात बापू भागवत तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा गोळीबार कोणी केला याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत दिवसा ढवळया गोळीबार झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरु असताना अशी घटना घडल्याने अर्श्चय व्यक्त केले जात आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळाकडे रवाने झाले. त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. मात्र, अर्थीक कारणावरुनच गोळीबार झाला असेत, अशी चर्चा या भागात आहे. यामध्ये जखमी झालेले बापू भागवत हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्यांना पंढरपूरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoot brok out in Pandharpur taluka