esakal | चिंता वाढली! कोरोनाने आज पुन्हा घेतला सहा जणांचा बळी;  एकाच दिवशी आढळले 49 बाधित

बोलून बातमी शोधा

Six death in a today due to corona in Solapur

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

चिंता वाढली! कोरोनाने आज पुन्हा घेतला सहा जणांचा बळी;  एकाच दिवशी आढळले 49 बाधित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
आज मयत झालेल्या व्यक्तीमध्ये अक्कलकोट शहरातील मधला मारुती गल्ली येथील 46 वर्षाच्या पुरुषाला 20 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांचे निधन झाले. पत्रा तालीम उत्तर कासबा परिसरातील 71 वर्षीय पुरुषाला 21 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 21 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. एमआयडीसी रोड परिसरातील शिवशरण नगर मधील 52 वर्षीय पुरुषाला 16 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 23 मे रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे निधन झाले आहे. मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरातील एकूण 70 वर्षीय महिलेला आठ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 22 मे रोजी सकाळी दहा वाजता त्या महिलेचे निधन झाले आहे. मोदी परिसरातील 67 वर्षीय महिलेला 13 मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेचा 23 मे रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठ परिसरातील 78 वर्षीय महिलेला 21 मे रोजी रात्री साडे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 23 मे रोजी सकाळी आठ वाजता या महिलेचे निधन झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
आज नव्याने आढळलेल्या 49 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये गंगा चौक नीलम नगर येथील एक महिला, मजरेवाडी राऊत वस्ती येथील एक पुरुष, कुर्बान हुसेन नगर येथील एक पुरुष, कर्णिक नगर येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील दोन पुरुष, बुधवार पेठेतील एक पुरुष, सिद्धेश्वर नगर येथील एक पुरुष, फॉरेस्ट रेल्वे लाईन येथील एक महिला, विडी घरकुल येथील दोन पुरुष, जुना विडी घरकुल येथील दोन महिला, इंदिरानगर 70 फूट रोड येथील दोन पुरुष व एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष, मोदी पोलीस स्टेशन परिसरातील दोन पुरुष,पाछा पेठेतील दोन पुरुष व एक महिला,  बादशा पेठेतील दोन महिला, न्यू बुधवार पेठेतील तीन महिला, एमआयडीसी रोडवरील मैत्री नगर मधील एक पुरुष व एक महिला, आरटीओ ऑफिस जवळील निखिल पार्क येथील एक पुरुष, शाहीर वस्ती भवानी पेठ येथील एक पुरुष, मोदी येथील एक महिला, सुशील नगर विजापूर रोड येथील एक पुरुष, एमआयडीसी रोड वरील अंबिका नगर येथील एक महिला, साईबाबा चौकातील तीन महिला, बाळीवेस येथील एक पुरुष व चार महिला, सातरस्ता येथील एक पुरुष, पोलीस मुख्यालय अशोक चौकातील एक पुरुष, शामा नगर मोदी येथील दोन पुरुष व एक महिला, अक्कलकोट मधील मधला मारुती गल्ली येथील एक पुरुष, सिव्हिल हॉस्पिटल क्वॉर्टर (मुळगाव जांबुड, ता.  माळशिरस)  येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या 25 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अद्यापही 52 कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.