..तर गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये लिटर अनुदान द्या कोणी केली मागणी? वाचा 

natepute bjp.jpg
natepute bjp.jpg
Updated on

नातेपुते(सोलापूर)ः शासनाने गायीच्या दुधाला सरसकट 10 रु. लिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो 50 रु. अनुदानाच्या मागणी करिता माळशिरस तहसील कार्यालय येथे भाजप व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. 

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बॅंकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणांमुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या मालिकेत आता दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या वेळी नायब तहसीलदार तुषार देशमुख व श्री. काळे यांनी निवेदन स्विकारले.  

यावेळी आमदार राम सातपुते, भाजपा जेष्ठ नेते के. के. पाटील, तालुकाध्यक्ष सोपानराव नारनवर, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गोरड, रिपाई तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले, रासप तालुकाध्यक्ष रणजित सूळ, हनुमंत सूळ, सोमनाथ भोसले, किरण धाईजे, सुरेश तरंगे, मुक्ता कोरबू, बाळासाहेब वावरे, बाळासाहेब सरगर, युवराज वाघमोडे, शहाजी सरगर, प्रविण काळे, महेश सोरटे, सोमनाथ भोसले, बशीर काझी, हनुमंत करचे, भैय्या चांगण, विनोद थिटे, दत्ता करचे, डॉ. अक्षय वाडकर, महादेव कावळे, डॉ.पताळे आदी उपस्थित होते. 


संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A demand has been made to urgently fill more than 27 vacant posts in the health department across Mangalwedha taluka.
Sugar Factory
MIDC
Engineering Admission
Marathi News Esakal
www.esakal.com