म्हणून महिला आपल्या कपाळावर लावतात कुंकू

So women past kunku on their foreheads
So women past kunku on their foreheads

सोलापूर : हिंदू धर्मात कुंकूला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्यात कुंकूचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यातील कुंकूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिने कपाळावर लावलेले कूंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळख, सौभाग्याचं देणं मानले जाते. सौभाग्याचे (पतीचे) आयुष्य भरपूर राहावे, यासाठी महिला कपाळावर कुंकू लावतात.
विवाहित स्त्रीच्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख समृद्धीचा परिचय करून देते. तिच्या नावाने लावलेली चिन्ह तिच्या अखंड विवाहित असण्याची निशाणी दर्शवते. एका विवाहित स्त्रीसाठी सर्व सोळा शृंगार मधून कुंकू अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक महिला कपाळभर कुंकू लावतात. मात्र आता या कुंकाची जागा टिकलीने घेतली असली तरी त्याचे महत्त्व कायम आहे. सण, उत्सव घरगुती कार्यक्रमात अजूनही कुंकूचाच वापर केला जातो.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच कुंकू लावलेल्या स्त्रीला आरोग्याविषयी लाभ होतात. कुंकू लावल्याने मेंदूला शितलता मिळते आणि डोके शांत राहते.
प्रिया सुरवसे म्हणाल्या, कुंकू लावल्याने स्त्रियांच्या सौंदर्यांमध्ये वाढ होते. अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून दिसते. तसेच स्त्रिया कुंकू लावल्याने लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहतात. पुरुषांचे आयुष्य वाढावे म्हणून पत्नी आपल्या कपाळावर कुंकू लावते, असं सांगितले जात असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच कुंकू लावल्यावर कपाळावरील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो. 
अनिता भोसले म्हणाल्या, मुलीचा विवाह होतो. तेव्हा लग्नानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्यावर एक साथ पडते. आणि याचा सर्व प्रभाव नवविवाहित स्त्रीच्या मेंदूवर पडतो. त्यामुळे ताण वाढतो. अन्य मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी कपाळाच्या मधोमध कुंकू लावल्याने स्त्रीचा मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. यामुळे लग्नानंतर स्त्रीला कुंकू लावतात. 
रेणुका मोरे म्हणाल्या, कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. प्रत्येक सौभाग्यवती कुंकूला धन मानते.  
पद्माकर जोशी म्हणाले, कुंकू वापरण्यामागे शास्त्रशुद्ध कारण आहे, महिला कपाळावर कुंकू लावतात कारण कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते.

स्त्रियांचे वर्षभरातील हळदीकुंकूचे महत्त्वाचे सण

  • - चैत्रगौरी
  • - वटपौर्णिमा
  • - श्रावण महिना- नागपंचमी मंगळागौरी, सत्यनारायण
  • - भाद्रपद महिना -हरितालिका, ज्येष्ठ गौरी पूजन
  • - नवरात्र
  • -  कोजागिरी पौर्णिमा- दिवाळी लक्ष्मीपूजन, मार्गशीर्ष गुरुवार व्रत
  • -  मकरसंक्रांत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com