
लॉकडाउनमुळे अनेकांसमोर निर्माण होतील प्रश्न
कोरोनाच्या सुरवातीला लॉकडाउनचा अनुभव पाहिला असून हातावरील पोट असलेल्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न मोठा आहे. त्यामुळे लॉकडाउन होण्यापेक्षा सर्वांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करायला हवे.
- मीनाक्षी पवार, शिक्षिका
सोलापूर : राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांचे वर्तन पाहून आठ दिवसांनी लॉकडाउनचा निर्णय घेऊ, असे जाहीर केले. मात्र, लॉकडाउनमुळे अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभारतो आणि त्यामुळे अनेकांचे जगणेच मुश्किल होते. त्यामुळे आम्ही नियम पाळू, तुम्हीपण नियमांचे पालन करा, असे आवाहन सोलापुकरांनी केले आहे.
लॉकडाउनमुळे अनेकांसमोर निर्माण होतील प्रश्न
कोरोनाच्या सुरवातीला लॉकडाउनचा अनुभव पाहिला असून हातावरील पोट असलेल्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न मोठा आहे. त्यामुळे लॉकडाउन होण्यापेक्षा सर्वांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करायला हवे.
- मीनाक्षी पवार, शिक्षिका
सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सुधारत आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर बेजबाबदारपणा वाढू लागल्याचे चित्र असून बेशिस्त वाहनचालकांचीही संख्या लक्षणीय झाली. 24 मार्चनंतर लॉकडाउन केला आणि संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. अनेकांसमोर बॅंका, खासगी सावकारांच्या देण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून अनेकांनी आत्महत्या करुन आपले जीवनही संपविल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन नकोच, यादृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. सोलापुरकांनी आतापासूनच निश्चिय करायला सुरवात केली आहे. शाळा बंद राहिल्यास मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक पालक बालवयातच मुलीचा विवाह लावून देण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाउनचे संकट पुन्हा येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार सर्वांनी नियमांचे पालन करावे.
नियमांचे पालन करा, कोरोना जाईल
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून सर्वांनीच स्वत:सह प्रत्येकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायला हवी. शहरातील कोरोनाची स्थिती सुधारु लागली असून रुग्ण वाढणार नाही, यादृष्टीने सर्वांनी मास्क घालायला हवा. सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता ठेवावी.
- अश्विनी लांबतुरे, शिक्षिका
लॉकडाउनमुळे लोकांचे जगणे कठीण होईल
लॉकडाउन काळात शाळा, कॉलेज बंद होते, संपूर्ण जनजीवन ठप्प राहते. लोकांचे जगणे कठीण होऊन जाते. कोरोनाची स्थिती सुधारु लागली असून लसही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी काही दिवस नियमांचे पालन केल्यास निश्चितपणे कोरोना हद्दपार होईल.
- मिनल कुलकर्णी, जुळे सोलापूर
नियमांचे पालन केल्यास लॉकडाउनची वेळ येणार नाही
अनलॉकनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असून सभा, सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. परंतु, कोरोना आता पुन्हा जोर धरु लागल्याने सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता राखायला हवी. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबेल आणि लॉकडाउनची वेळ येणार नाही.
- संगिता घोंगडे, शिक्षिका