अक्कलकोट मधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

प्रमोद बोडके
शनिवार, 23 मे 2020

अक्कलकोट मधील या व्यापाऱ्याचे फरशी व्यवसायानिमित्त मैंदर्गी येथेही येणे-जाणे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मयत व्यापारी ज्या परिसरात राहत होते  तो परिसर, ते व्यापारी ज्या भागात जात होते तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

 सोलापूर : सोलापूर शेजारी असलेल्या अक्कलकोट शहरातही आज कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरातील ४६ वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.
 
निमोनियाचा त्रास होत असल्याने हे व्यापारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा त्यांना सल्ला दिला. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुरात पाठविण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्या व्यापाऱ्याचा 21 मे रोजी मृत्यू झाला आहे. त्यांना गेल्या वर्षी देखील निमोनिया झाल्याचे समजते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

अक्कलकोट मधील या व्यापाऱ्याचे फरशी व्यवसायानिमित्त मैंदर्गी येथेही येणे-जाणे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मयत व्यापारी ज्या परिसरात राहत होते  तो परिसर, ते व्यापारी ज्या भागात जात होते तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur akkalkot corona death news