शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे अडविणा-या महाविद्यालयांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवत्ती न आल्यास फी वसूल करीत असतील तसेच दुस-या महाविद्यालयात पुढील शिक्षण प्रवेशासाठी जी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे देणार नाहीत. अशा महाविद्यालयांवर सोलापूर साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असा आदेश २० डिसेंबर २०२० रोजी काढण्यात आला आहे.

तिसंगी (सोलापूर) : अभियांत्रिकीचे तसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छुणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असते. माञ ही शिष्यवृत्ती शासनाकडून न मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील काही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना मुळ कागदपत्रे देण्यासाठी आडकाठी घातली जात असल्याबाबतच्या तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. सोलापूर साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाने १ डिसेंबर २०२० रोजी लेखी स्वरुपाच्या पञाद्वारे विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती वसुल करण्यासाठी मूळ कागदपत्रे देणार नाहीत, अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश जारी केला आहे.

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग शासन पञ क्र. विपआ-२०१३/प्र.क्र.१०७/शिक्षण-१ दि.२७ जुन २०१३ नुसार जी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती वसूल करतील, अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशित आहे. शिवाय सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग शासन शुद्धीपञक क्र. इबीसी-२००५/प्र.क्र.४०१/मावक-२ दि. १७ जानेवारी २००६ नुसार विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क वसूल प्रतिपुर्ती करण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. जी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क वसूल करतील, अशा महाविद्यालयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यास देखील आदेशित आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवत्ती न आल्यास फी वसूल करीत असतील तसेच दुस-या महाविद्यालयात पुढील शिक्षण प्रवेशासाठी जी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे देणार नाहीत. अशा महाविद्यालयांवर सोलापूर साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असा आदेश २० डिसेंबर २०२० रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात उच्चशिक्षण घेता येणार आहे. जर असे एखादे महाविद्यालय विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे देण्यास नकार देत असेल तर विद्यार्थ्यांनी व पालकांनी सोलापूर साहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Assistant Commissioner Social Welfare Department will take action against the colleges which are blocking the documents for scholarship