महापालिकेचा निर्णय! बॉईज नागरी आरोग्य केंद्रात होणार 50 ऑक्‍सिजन बेड हॉस्पिटल 

18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg
18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg

सोलापूर : शहरात महापालिकेचे 15 नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी बाईज नागरी आरोग्य केंद्रात महापालिकेतर्फे 50 ऑक्‍सिजन बेडचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. 
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सहजपणे दर्जेदार उपचार करता यावेत, या हेतूने महापालिकेने नियोजन केले आहे. 

आठवड्यात सुरु होईल हॉस्पिटल 
शहरातील बॉईज नागरी आरोग्य केंद्रात 50 ऑक्‍सिजन बेडचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. पाईपलाईनचे काम आता युध्दपातळीवर सुरू आहे. चार दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल. या माध्यमातून शहरातील रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्‍य होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून निधीही मिळाला असून डॉक्‍टर, कर्मचारीही उपलब्ध असल्याने काही दिवसांत हॉस्पिटल सुरू होईल. 
- डॉ. शितलकुमार जाधव, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

शहरातील मृत्यूदर आता कमी झाला असला तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. तत्पूर्वी, महापालिकेने काही साधनसामुग्री खरेदी केली आहे. ते साहित्य सध्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आहे. बॉईज नागरी आरोग्य केंद्रात नवीन रुग्णालय सुरू केल्यानंतर ते साहित्य परत घेतले जाणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेच्या वतीने कम्युनिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यानंतर आता ऑक्‍सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे. सर्वोपचार रुग्णालयावरील ताण विचारात घेता आणि खासगी हॉस्पिटलमधील बिलांच्या तक्रारी पाहता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. शहरात कोरोनाचे आगमन झाल्यापासून महापालिकेने काहीच ठोस पाऊल उचलले नव्हते. आता प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. हे हॉस्पिटल कायमस्वरुपी सुरू राहील, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com