लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांनी बाजारात केली किराणा खरेदीसाठी गर्दी 

प्रकाश सनपूरकर
शनिवार, 11 जुलै 2020

अनलॉकच्या काळात कोरोना संसर्गात वाढ झाल्याने लॉकडाउनबद्दल विचार केला जात होता. त्याबाबत अनेक प्रकारे तर्कवितर्क केले जात होते. बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्यांची वाढती संख्या व मास्क न वापरणाऱ्याचा त्रास बाजारपेठेत मागील काही दिवसापासून वाढला होता. या प्रकाराने व्यापारी देखील चांगलेच त्रस्त झाले होते. या बेशिस्त लोकांमुळे विनाकारण व्यापारी देखील स्वतःची काळजी कशी घ्यावी या चिंतेत सापडले. मात्र, या आठवड्यात लॉकडाउनची चर्चा अधिकच वाढली होती. 

सोलापूरः शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन होणार या भीतीने मोठ्या प्रमाणात किराणा व इतर गरजेच्या वस्तु खरेदी करण्यासाठी आज दुकानांवर गर्दी केली होती. ही सर्व गर्दी किराणासाठी असल्याने दुकानदारांना ग्राहकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करावे लागले. 

हेही वाचाः विठ्ठलाच्या गर्भगृहात मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला घातले स्नान! वारकऱ्यांमधुन तिव्र नाराजी 

अनलॉकच्या काळात कोरोना संसर्गात वाढ झाल्याने लॉकडाउनबद्दल विचार केला जात होता. त्याबाबत अनेक प्रकारे तर्कवितर्क केले जात होते. बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्यांची वाढती संख्या व मास्क न वापरणाऱ्याचा त्रास बाजारपेठेत मागील काही दिवसापासून वाढला होता. या प्रकाराने व्यापारी देखील चांगलेच त्रस्त झाले होते. या बेशिस्त लोकांमुळे विनाकारण व्यापारी देखील स्वतःची काळजी कशी घ्यावी या चिंतेत सापडले. मात्र, या आठवड्यात लॉकडाउनची चर्चा अधिकच वाढली होती. 

हेही वाचाः सोलापूरमध्ये मानधनाच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी उतरले रस्त्यावर 

तेव्हा शहरातील कुंभारवेस भागातील भुसार मार्केटमध्ये आज सकाळ पासून गर्दी वाढली होती. लॉकडाउन होण्याची शक्‍यता पाहता नागरिकांनी दुकानासमोर खरेदीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून रांगा लावल्या होत्या. तेल, दाळी, मसाले, गहू व रोजच्या वापरातील वस्तुंची खरेदी केली जात होती. अचानक ग्राहक वाढल्याने व्यापारी देखील त्यांना शिस्तीने सामान देत होते. दोन दिवसापासून या दुकांनावर खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली आहे. या सोबत आयुर्वेदीक वस्तुच्या दुकानात काढा साहित्य खरेदी केले. कोणत्याही क्षणी लॉकडाउन जाहीर होईल, अशी शक्‍यता पाहून बाजार खरेदीसाठी फुलला होता. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाउन अपरिहार्य आहे असे मानले जात आहे. 

ग्राहकांच्या रांगांना लावली शिस्त 
मागील दोन दिवसापासून किराणा खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. लॉकडाउनच्या चर्चेमुळे ग्राहकांचा घरी किराणा माल भरुन ठेवण्याकडे कल आहे. दुकानांची वेळ वाढवल्याने त्याचा उपयोग लोक खरेदीसाठी करत आहेत. 
- आनंद आडके, किराणा दुकानदार, कुंभारवेस 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, citizens rushed to buy groceries for fear of lockdown