दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सोलापूर शहर राष्ट्रवादीचे समर्थन 

प्रमोद बोडके
Saturday, 5 December 2020

शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश प्रवक्ता मनोहर सपाटे, जेष्ठ पदाधिकारी जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ नेते राजन जाधव, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, महिलाध्यक्षा सुनिता रोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. 

सोलापूर : केंद्र सरकारने आणलेले कृषि विषयक कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत हे कायदे रद्द करण्याची मागणी पंजाब व हरियाणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. हे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक आंदोलन केले. 

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला सोलापुरातून आज मोठा पाठिंबा मिळाला. शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश प्रवक्ता मनोहर सपाटे, जेष्ठ पदाधिकारी जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ नेते राजन जाधव, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, महिलाध्यक्षा सुनिता रोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. 

यावेळी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत सावळे, उपाध्यक्ष मनिषा माने, माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार, जावेद खैरदी, सोशल मीडिया शहराध्यक्ष प्रमोद भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष तनवीर गुलजार, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur city NCP's support to the farmers' movement in Delhi