शहरात आज 68 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा झाला मृत्यू 

तात्या लांडगे
Tuesday, 15 September 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 72 हजार 921 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले सात हजार 596 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 68 व्यक्‍ती पॉझिटिव्ह, तर दोघांचा झाला मृत्यू 
  • मृतांची संख्या आता 448 : सहा हजार 361 रुग्णांची कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत 787 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांत उपचार 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून दुसरीकडे टेस्टिंगची संख्या मात्र घटली आहे. आज 599 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 68 पॉझिटिव्ह सापडले. दहिटणे परिसरातील चॉंद गणेश नगर येथील 53 वर्षीय पुरुष आणि विजयपूर रोडवरील रोहिणी नगरातील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

ठळक बाबी... 

  • शहरातील 72 हजार 921 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले सात हजार 596 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 68 व्यक्‍ती पॉझिटिव्ह, तर दोघांचा झाला मृत्यू 
  • मृतांची संख्या आता 448 : सहा हजार 361 रुग्णांची कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत 787 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांत उपचार 

सेव्हेन्थ हेवेन अपार्टमेंट, रोटे अपार्टमेंट (रेल्वे लाईन), उजनी कॉलनी (गुरुनानक चौक), एसआरपी कॅम्प, गोल्डफिंच पेठ, भारतरत्न इंदिरानगर (70 फूट रोड), श्रध्दा वैभव अपार्टमेंट (भवानी पेठ), स्वागत नगर (कुमठा नाका), चिदंबर नगर, डीडीसी बॅंक कॉलनी, राजस्व नगर, निर्मिती विहार, कोर्ट कॉलनी, विनय हौसिंग सोसायटी (विजयपूर रोड), रामशंकर अपार्टमेंट (लष्कर), काडादी नगर, अंत्रोळीकर नगर, वृदांवन पार्क (होटगी रोड), गोल्डफिंच पेठ, पोलिस मुख्यालयाजवळ, दक्षिण कसबा, मंगल विहार, शारदा नगर (जुळे सोलापूर), मंगळेवेढेकर चाळ (मुरारजी पेठ), स्वामी विवेकानंद नगर (मजरेवाडी), आसरा सोसायटी, निलम नगर, राजू नगर दोन क्र. झोपडपट्टी, इंदिरा नगरजवळ, सावली सोसायटी (इंदिरा नगर), समाचार चौक, मंगळवार पेठ, पद्मनगर, नई जिंदगी, एमआयडीसीजवळ, लष्कर, दाजी पेठ, लोखंडवाला रेसिडेन्सी, मुरारजी पेठ, इंद्रधनू अपार्टमेंट, गुरुनानक नगर, ऋषिकेश नगर (दहिटणे), विनायक रेसिडेन्सी, बाळे, दत्त चौक, शिवाजी नगर (बाळे), मुर्गीनाला, दक्षिण कसबा, गणेश नगर (मुळेगाव रोड), मल्लिकार्जुन नगर (अक्‍कलकोट रोड), सैफूल, ढोणे नगर, थोबडे नगर (शेळगी) आणि मजरेवाडी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the solapur city today, 68 positive and two died