सोलापूर बंद ! लालपरीला 10 लाखांचा फटका; आजपासून बससेवा पूवर्वत

1st_129 (1) - Copy.jpg
1st_129 (1) - Copy.jpg

सोलापूर : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणावरील स्थगिती उठवून ते कायम ठेवावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 21) शहर- जिल्हा बंद ठेवण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यातील संपूर्ण एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे राज्य परिवहन विभागाला दहा लाखांचा फटका बसल्याची माहिती आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली.

राज्य सरकारने 16 ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. त्यानंतर ढिगभर आव्हाने समोर ठेवून लालपरी पुन्हा रस्त्यांवर धावू लागली. सोलापूर विभागातून 217 बस विविध मार्गांवर धावत आहेत. त्यासाठी दररोज चार ते साडेचार हजार लिटर इंधन लागते. इंधनावर दररोज चार ते साडेचार लाखांचा खर्च होत आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे वेतन, गाड्यांची देखभाल- दुरुस्तीवरही पाच ते सहा लाखांचा खर्च होत आहे. दुसरीकडे दररोजचे उत्पन्न मात्र, नऊ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत असल्याने सरकारकडून संपूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसू लागला आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरुन राज्यभर तीव्र पडसाद उमटत असल्याने सोलापुरातील बससेवा एक दिवस बंद ठेवण्यात आली होती.

सकाळी सहा वाजल्यापासून सेवा पूर्ववत 
सोलापूर विभागातून 217 बस दररोज धावतात. त्या बसचे वाहक आणि चालक असे एकूण 434 लोक आंदोलनामुळे निवांतच होते. मेकॅनिक विभाग वगळता सर्वच विभाग दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. उद्यापासून (ता. 22) बससेवा पूवर्वत होणार असून सकाळी सहा वाजता पहिली बस सुटेल, अशी माहिती आगार व्यवस्थापक तथा वाहतूक अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com