#Coronavirus : घरात थांबा..! हे पोलिसांनी सांगायची गरजच काय?

परशुराम कोकणे
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोना पार्श्‍वभूमीवर कोणीही घराबाहेर जऊ नये. हे पोलिसांनी किंवा अन्य कोण सांगायची गरजच काय? अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून घराबाहेर फिरत आहेत. आपण स्वत:ला, कुटुंबीयांना वाचवत घरात बसलो आहोत, पण पोलिस मात्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर आहेत, त्यांचाही विचार करावा. 
- विद्या ढोले, 
इंटिरिअर डिझायनर 

सोलापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जऊ नका.. मास्क लावा.. संचारबंदीचे उल्लंघन करू नका.. हे सांगताना कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उभ्या पोलिसांचा कोणीच विचार करताना दिसत नाहीत. संसर्ग टाळण्यासाठी घरातच थांबा.. हे पोलिसांनी सांगण्याची गरजच काय? जगावर आलेल्या संकटप्रसंगी सर्वांनी स्वयंशिस्त दाखविणे आवश्‍यक आहे. 

#Coronavirus : स्वत:ची, कुटुंबीयांची काळजी घेत पोलिस ड्यूटीवर सज्ज!

संचारबंदी लागू झाल्यापासून रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी असली तरी शहर पूर्णपणे लॉकडाउन झालेय असे म्हणता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आजपर्यंत एक हजार 476 जणांवर तर पालेभाजी, किराणा, औषध, वैद्यकीय कारण सांगून वाहने घेऊन रस्त्यावर आणणाऱ्या सात हजार 655 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई वाढवूनही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी दिवसभरात 332 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी पोलिसांना त्रास न देत घरातच थांबावे, असे आवाहन सूज्ञ सोलापूरकरांनी केले आहे. 

सुज्ञ सोलापूरकर म्हणतात..

कोरोनाबाबत भीती असताना सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिस धडपडत आहेत. पोलिसांच्या सेवेचे खरंच कौतुक करावे. नागरिकांनी अत्यावश्‍यक सेवेशिवाय घराबाहेर जाऊ नये. आता अनेक सुविधा घरपोच, ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. 
- जे. डी. ढगे, 
निवृत्त प्राध्यापक 

संचारबंदी लागू झाल्यापासून मी घराबाहेर गेलो नाही. आपल्यामुळे पोलिसांना किंवा प्रशासनाला त्रास होऊ नये याची दक्षता सर्वांची घ्यावी. नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांना गस्त घालून, नाकाबंदी करून कारवाई करावी लागत आहे. पोलिसांना सर्वांनी सहकार्य करावे. 
- सिद्धाराम हिरेमठ, 
व्यावसायिक 

कोरोना पार्श्‍वभूमीवर कोणीही घराबाहेर जऊ नये. हे पोलिसांनी किंवा अन्य कोण सांगायची गरजच काय? अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून घराबाहेर फिरत आहेत. आपण स्वत:ला, कुटुंबीयांना वाचवत घरात बसलो आहोत, पण पोलिस मात्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर आहेत, त्यांचाही विचार करावा. 
- विद्या ढोले, 
इंटिरिअर डिझायनर 

कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता सर्वांनी घरातच थांबावे. बाहेर जाणाऱ्यांवर कारवाई करावी लागत आहे. घरातच थांबा असं पोलिसांनी सांगण्याची वेळ का यावी? आपण रस्त्यावर येणे म्हणजे स्वत:ला आणि इतरांना धोका निर्माण करण्यासारखे आहे. पोलिसांना त्रास देण्याचा आपल्याला अधिकार नाही. मी मागील 15 दिवसांत घरात बसून आहे. 
- राजेश बोल्ली, 
उद्योजक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur on Corona background