#Coronavirus : स्वत:ची, कुटुंबीयांची काळजी घेत पोलिस ड्यूटीवर सज्ज!

परशुराम कोकणे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

तोंडाला मास्क लावूनच ड्यूटीवर जात आहे. नाकाबंदीवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहोत. वाहन चालकांची कागदपत्रे हातात न घेता पाहत आहोत. घरी गेल्यानंतर अंघोळ करूनच आत जात आहे. सध्याची ड्यूटी अधिकच आव्हानात्मक आहे. 
- रेश्‍मा मोरे, 
पोलिस नाईक

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांना घरात बसण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिसांना मात्र ड्यूटीवर थांबावे लागत आहे. नाकाबंदीवेळी हजारो लोकांशी पोलिसांचा संपर्क येत आहे. वाढलेल्या तापमानात ड्यूटी करताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणींवर मात करीत पोलिस अधिकारी, कर्मचारी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेत आहेत. 

#Lockdown : मित्रांसोबत पोलिस जीपमध्ये पार्टी! चौघांवर गुन्हा; पोलिस निलंबीत

कोरोना आलाय, पप्पा तुम्ही बाहेर जाऊ नका ना... असे पोलिसाला म्हणत असलेल्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी घरात बसणे आवश्‍यक असले तरी पोलिसांना मात्र ड्यूटी करावी लागत आहे. संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिस स्वत:चा जीव धोक्‍यात घालत आहेत. मुंबईत एका पोलिस कर्मचाऱ्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

#Solapur : बाहेर पडू नका... किराणा, भाजीपाला, औषध मिळेल घरपोच!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ड्यूटीवर असलेले सर्वच पोलिस मास्क, हॅंड सॅनिटायझर वापरत आहेत. नाकाबंदीवेळी नागरिकांची चौकशी करताना पोलिस सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत. ड्यूटीवरून घरी गेल्यावर अंघोळ करत आहेत. घरातील लहान मुलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण ड्यूटीवर वापरलेले कपडे स्वत:च धुवत आहेत. घरात असूनही वेगळे राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या वाहनांवर सॅनिटायझरची फवारणी केली आहे. 

संचारबंदीच्या कालावधीत नाकाबंदी आणि गस्तीची ड्यूटी 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना देऊ नये असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना सांगितले आहे. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व पोलिसांना मास्क देण्यात आले आहेत. सर्व पोलिस ठाण्यासमोर हॅंडवॉशची व्यवस्था केली आहे. सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्यूटीवर असताना सोशल डिस्टन्सिंगबाबत सांगितले आहे. मी स्वत:ही या सर्वांचे पालन करत आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त 

ड्यूटीमुळे मला घराबाहेर पडावे लागते. घरी गेल्यानंतर कपडे, शूज बाहेर काढून अंघोळ करूनच घरात जात आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सोलापुरात नसला तरी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. 
- इमरान शेख, 
पोलिस नाईक 

तोंडाला मास्क लावूनच ड्यूटीवर जात आहे. नाकाबंदीवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहोत. वाहन चालकांची कागदपत्रे हातात न घेता पाहत आहोत. घरी गेल्यानंतर अंघोळ करूनच आत जात आहे. सध्याची ड्यूटी अधिकच आव्हानात्मक आहे. 
- रेश्‍मा मोरे, 
पोलिस नाईक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police duty news at solapur