धक्कादायक.... सोलापूर शहरात 77 नवे कोरोनाबाधित, एकूण पॅाझीटीव्ह १७४९

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 17 जून 2020

सोलापूर शहरात बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या ७७ ने वाढली. त्यामध्ये ५७  पुरुष आणि २० महिला रुग्णांचा समावेश आहे. 

सोलापूर : महापालिका हद्दीत बुधवारी तब्बल ७७ जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १७४९वर पोचली आहे. तर आज ३३ जण बरे होऊन परत गेले आहेत. 

शहरातील दक्षिण कसबा, नाथ रेजन्सी भवानी पेठ, सुविद्यानगर विजापूर रस्ता, रामदेवकुंज मुरारजी पेठ, पुरीचंद्र अपार्टमेंट चौपड, विजयनगर नई जिंदगी, उत्तर कसबा पंजाब तालीम, सैफूल विजापूर रस्ता, शुक्रवार पेठ, देशपांडे कॅाम्प्लेक्स दक्षिण कसबा, जय मल्हा चौक, तुकाराम नगर, कुमारस्वामी सोसायटी, मित्रनगर शेळगी, भाग्यलक्ष्मी जवळ, जुळे सोलापूर, झोपडपट्टी क्रमांक १६ निराळे वस्ती, जोडभावी पेठ परिसर, अशोकनगर, सम्राट चौक, पूर्व मंगळवार पेठ, बोल्ली मंगल कार्यालयाजवळ, होमकरनगर, आंबेडकर नगर, राजीवनगर, उमानगरी, धरमसी लाईन,  या परिरिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona news