सोलापुरात आठ रुग्ण वाढले, एकूण पॅाझिटीव्ह 478

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

आतापर्यंत 175 रुग्ण बरे होऊन परतले आहेत, तर 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर - जिल्हा प्रशासनाने आज गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सोलापुरात आठ रुग्णांचे अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 478 झाली आहे. 

आज पॅाझिटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये चार पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळपर्यंत 62 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 54 अहवाल निगेटीव्ह आले, तर आठ पॅाझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 4893 अहवालांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4415 निगेटीव्ह आले आहेत, तर 478 पॅाझिटीव्ह आले आहेेत. आतापर्यंत 175 रुग्ण बरे होऊन परतले आहेत, तर 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corona news update