ऑनलाइन भरणा ; महापालिकेची तिजोरी भरू लागली 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 20 मे 2020

जीेएसटीतून 212 कोटी 52 लाख मिळाले 
जीएसटी अनुदानातून गेल्या 12 महिन्यांत महापालिकेस 212 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. महापालिकेला मिळालेले उत्पन्न आणि अनुदान असे मिळून या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत एकूण 395 कोटी 26 लाख 20 हजार 247 रुपये जमा झाले आहेत. 

सोलापूर : मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे गेल्या आठवडाभरात सुमारे 22 लाखांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे. याशिवाय, अभिलेखापाल कार्यालयात मृत्यू नोंदणीचे रोज किमान 20 अर्ज दाखल होऊ लागल्याने त्या विभागाचे शुल्कही मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले आहे. 

मूळचे सोलापूरचे असलेले पण सध्या राज्यातील किंवा देशातील विविध राज्यांत, जिल्ह्यांत वास्तव्यास असलेल्या अनेकजणांच्या मिळकती सोलापुरात आहेत. ऑनलाइन सुविधेमुळे त्यांना कर भरणे शक्‍य झाले आहे. कोरोनामुळे 17 मार्चपासून महापालिकेत कर भरून घेणे थांबविण्यात आले होते. तर तांत्रिक कारणामुळे 1 एप्रिलपासून ऑनलाइन प्रणालीही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात मिळकत करापासून महापालिकेस एक रुपयाही उत्पन्न मिळाले नव्हते. आता 13 मे पासून ऑनलाइन सुविधेमुळे कराचा भरणा सुरू झाला आहे. 

महापालिकेला 17 विभागांतून उत्पन्न मिळते. मार्च महिन्यात फक्त 18 कोटी 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 182 कोटी 74 लाख 20 हजार 247 रुपये उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या सभेने 447 कोटी 72 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्या तुलनेत मिळालेले उत्पन्न हे उद्दिष्टाच्या 40.86 टक्के इतकेच आहे. शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिल्यामुळे महापालिकेला अनपेक्षित कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. अनेक मिळकतदार मार्चअखेर थकबाकी भरतात, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे कर भरून घेणेही बंद करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेला त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

जीेएसटीतून 212 कोटी 52 लाख मिळाले 
जीएसटी अनुदानातून गेल्या 12 महिन्यांत महापालिकेस 212 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. महापालिकेला मिळालेले उत्पन्न आणि अनुदान असे मिळून या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत एकूण 395 कोटी 26 लाख 20 हजार 247 रुपये जमा झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur corporation tax recive online