esakal | पंढरपूर तालुक्यातील बार्डीत दहा मिनीटात पाणी- पाणीच
sakal

बोलून बातमी शोधा

In Solapur district bardi today 10 minutes rain

आज दिवसभर अगदी श्रावण महिन्यासारखा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. आकाशात क्षणात काळे ढग जमा होऊन पावसाची सर यायची. पुन्हा लगेच ऊन पडायचे. सायंकाळी पाच वाजता मात्र 10 मिनिटे जोराचा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणी झाले.

पंढरपूर तालुक्यातील बार्डीत दहा मिनीटात पाणी- पाणीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करकंब (सोलापूर) : करकंबचा पूर्वभाग आणि बार्डी (ता. पंढरपूर) येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. केवळ दहाच मिनिटे बरसलेल्या पावसाने सखल भागासह शेतातही पाणी साठले होते. 
आज दिवसभर अगदी श्रावण महिन्यासारखा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. आकाशात क्षणात काळे ढग जमा होऊन पावसाची सर यायची. पुन्हा लगेच ऊन पडायचे. सायंकाळी पाच वाजता मात्र 10 मिनिटे जोराचा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणी झाले. त्यानंतर ऊन पडून पूर्वेला निर्माण झालेल्या दुहेरी इंद्रधनुष्याने निसर्गात चांगलाच रंग भरला. गेल्या दोन दिवसांत या भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या होत्या. त्यामुळे काढणीस आलेले खरबुजाचे पीक जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, फुलोऱ्यात असणाऱ्या शेवग्याचीही फुलगळ होऊन उत्पादन घटणार आहे.