जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार

Solapur district's new superintendent of police Tejaswi Satpute said the police would keep an eye on the culprits.jpg
Solapur district's new superintendent of police Tejaswi Satpute said the police would keep an eye on the culprits.jpg
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि गुन्हेगारांवर कारवाई हे पोलिसांचे ब्रीद वाक्‍य आहे. जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याचे सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. 

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी अक्कलकोट उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्यास भेट देऊन कामकाजा आढावा घेतला. कोरोनासोबत सर्वाना लढायचे आहे. शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील. अक्कलकोटमध्ये मास्क वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. 'माझे कुटुंब, माझे जबाबदारी' या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यावेळी म्हणाल्या. 

विनाकारण गर्दी करू नये. कारण कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येकानी सुरक्षित अंतर पाळावे, मास्क वापरावे असे आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या नुतन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेवटी केले. यापवेळी डीवायएसपी संतोष गायकवाड, पो.नि. के.एस. पुजारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com