धक्‍कादायक! सोलापुरात कोरोनाचे 850 बळी; आतापर्यंत "एवढे' पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे 
Wednesday, 9 September 2020

ग्रामीण भागात दररोज सरासरी दोन हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. तर दुसरीकडे शहरातील टेस्टिंग खूपच कमी झाले असून दररोज सरासरी 400 ते 500 संशयितांची टेस्ट केली जात आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या व मृत्यू कमी करण्यात प्रशासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही. 

सोलापूर : आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील एक लाख 85 हजार 24 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये 21 हजार 667 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून, त्यापैकी तब्बल 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. 8) 403 रुग्णांची भर पडली असून दहाजणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : ब्रेकिंग! नगरसेवक कामाठीची बायकोही झाली पसार अन्‌ आता... 

शहरातील कोरोनाचा आता ग्रामीण भागाला विळखा पडला असून पंढरपूर, बार्शी, अक्‍कलकोट, माळशिरस या तालुक्‍यांत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मंगळवारी ग्रामीण भागात 337 रुग्ण सापडले असून आठजणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात 66 रुग्णांची भर पडली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात दररोज सरासरी दोन हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. तर दुसरीकडे शहरातील टेस्टिंग खूपच कमी झाले असून दररोज सरासरी 400 ते 500 संशयितांची टेस्ट केली जात आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. तर ग्रामीणमधील रुग्णसंख्या व मृत्यू कमी करण्यात प्रशासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही. शहरात आतापर्यंत दोनवेळा घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. दुसरीकडे तापसदृश रुग्णांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तरीही शहरातील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे कमी झालेला नाही. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूवर्वत होऊ लागले आहे. मात्र, सशर्त परवानगी देऊनही अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. 

हेही वाचा : एनआयएच्या विरोधात माकपकडून आक्रमक टीका : वाचा सविस्तर 

ठळक बाबी... 

  • शहरात सात हजार 145 तर, ग्रामीणमध्ये 14 हजार 522 रुग्ण 
  • आतापर्यंत 15 हजार 591 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • शहर-जिल्ह्यातील पाच हजार 26 रुग्णांवर सुरू आहेत उपचार 
  • आतापर्यंत 576 पुरुषांचा तर 274 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 

बाधित अन्‌ मृतांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक 
शहर-जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार 667 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पुरुषांचा समावेश असून मृतांमध्ये 576 पुरुष आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांचे तथा घरातील तरुण सदस्याच्या माध्यमातून वयोवृद्धाला झालेला कोरोना जीवघेणा ठरू लागल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सार्वजनिक ठिकाणी तथा गर्दीत मास्कचा वापर आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur has so far 850 death due to corona