सोलापूर मर्चंट बॅंकेचे पतसंस्थेत रुपांतरण झालेच पाहिजे : जिल्हा पतसंस्था फेडरेशनची स्पष्ट भूमिका 

dilip patange.jpg
dilip patange.jpg

सोलापूरः आर्थिक सक्षम असलेल्या सोलापूर मर्चंट बॅंकेचे पतसंस्थेत रुपांतरण करण्याच्या सभासदाच्या ठरावाला सहकार कायदा व रिझर्व्ह बॅंक यांची कोणतीही अडचण नसल्याने रण ठरावाची अमंलबजावणी झाली पाहिजे. या प्रयोगातून सहकार क्षेत्राला एक नवीन सकारात्मक संदेश जाणार आहे, अशी भूमीका जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनने घेतली आहे. 

याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन सोलापूर मर्चंट बॅंकेबाबत बॅंकेचे पतसंस्थेचे रुपांतर करण्याची मागणी केली. बॅंकेच्या आर्थिक स्थितीकडे सहकार खात्याचे लक्ष वेधले आहे. बॅंकेची आर्थिक स्थिती सरप्लस असल्यामुळे सभासदांनी अंतिम सर्वसाधारण सभेत अवसायक यांच्या कामकाजास विरोध करून बॅंकेचे पतसंस्था रूपांतर करून घेण्याचा ठराव बहुसंख्येने मंजूर करून घेतला होता. सभासदांचा हा ठराव म्हणजे पुनरुज्जीवनाच्या करण्याच मार्ग आहे. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 
सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 17 एक प्रमाणे बॅंकेचे पतसंस्थेत रूपांतर करून घेण्यासाठी सभासद सभासदांनी कायदेशीर पाठपुरावा केला आहे. परंतु सभासदांनी घेतलेल्या पतसंस्था रूपांतरण ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. सहकार क्षेत्रामध्ये संस्था जिवंत राहावी ही भूमिका आणि तत्व अभिप्रेत असताना आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने या भूमिकेतून सोलापूर मर्चंट बॅंकेच्या संदर्भात सहकार्य केलेली दिसून येत नाही. बॅंकेचे आर्थिक उत्पन्न पाहता पतसंस्था म्हणूनही बॅंक उत्तम पद्धतीने काम करू शकते. तसेच सहकार जिवंत राहण्यासाठी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. 
यापूर्वी सोलापूर मर्चंट बॅंकेचे पतसंस्थेत रूपांतर करण्यासाठी सभासदांनी ठरावाची कायदेशीर तपासणी झाली आहे. या बाबत ऍड.उमेश मराठे यांनी अभिप्राय देऊन याबाबत कायदेशीर तपासणी करून रूपांतर करण्याची तरतूद सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 17 (1) ड मध्ये आहे असा अभिप्राय दिला होता. तसेच माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील हा प्रस्ताव तपासून सादर करावा अशी सूचना दिली होती. सभासदांनी बॅंकेचे पतसंस्थेत रूपांतर करण्यासाठी अवसायकांना सभासदांची सर्वसाधारण सभा बोलावण्याचे पत्रही दिलेले आहे. बॅंकेच्या सर्वसाधारण शेवटच्या सभेचे इतिवृत्त जिल्हा उपनिबंधकांना दिलेले आहे. त्यामध्ये रूपांतरणाची ठराव नोंदवलेला आहे. संस्थेची सदस्य नोंदणी रद्द झालेली नाही. त्यामुळे संस्थेचे अस्तित्व कायम आहे. पतसंस्था म्हणून ही संस्था काम करू शकते. रिर्झव्ह बॅंकेने देखील रुपांतरणाबाबत कोणत्याही ना हरकत पत्राची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रुपांतरणात कोणताही अडथळा नाही असे श्री.पतंगे यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com