महापालिका आयुक्‍तांचे आदेश ! दिवाळीनिमित्त शिक्षकांना 11 दिवस कोरोना ड्यूटीतून सुट्टी 

तात्या लांडगे
Monday, 9 November 2020

को- मॉर्बिड रुग्णांची फोनवरुन साधणार संवाद 
दिवाळीनिमित्त को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. या काळात को- मॉर्बिड रुग्णांशी संवाद साधण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधी नियोजन सुरु आहे. परंतु, अशा रुग्णांशी फोनवरुन संपर्क साधला जाईल. 
- धनराज पांडे, उपायुक्‍त 

सोलापूर : शहरात को-मॉर्बिड रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक आहे. त्यांच्या आरोग्यावर शिक्षकांच्या माध्यमातून नियमित वॉच ठेवला जात आहे. मात्र, एप्रिलपासून सर्व्हेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना दिवाळीनिमित्त 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. या काळात महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे या काळात बंदच ठेवला जाणार आहे. 

 

को- मॉर्बिड रुग्णांची फोनवरुन साधणार संवाद 
दिवाळीनिमित्त को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. या काळात को- मॉर्बिड रुग्णांशी संवाद साधण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधी नियोजन सुरु आहे. परंतु, अशा रुग्णांशी फोनवरुन संपर्क साधला जाईल. 
- धनराज पांडे, उपायुक्‍त 

 

जगभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा असतानाच 'कुटूंब माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेची संपूर्ण जबाबदारी सोलापूर महापालिकेने शहरातील शिक्षकांवर सोपविली. मागील सात महिन्यांपासून सातत्याने को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणारे शिक्षक दिवाळीनिमित्त सुट्टी मिळावी म्हणून आक्रमक झाले. त्यांनी आज (सोमवारी) महापालिकेत ठिय्या मांडला होता. त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी, शिक्षकांना दिवाळी सुट्टी देण्यावरुन राज्य सरकारकडे बोट दाखविणाऱ्या आयुक्‍तांनी एक पाऊल मागे घेत शिक्षकांना 11 दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांना सुट्टी मिळाल्यानंतर या काळात को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करण्याची व्यवस्थाच महापालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे. शहरातील एकूण मृतांमध्ये आतापर्यंत 60 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण को- मॉर्बिडच आहेत. त्यामुळे आता या काळात को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • जितेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली दोनदा निघाला महापालिकेत मोर्चा 
  • शिक्षकांशिवाय को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेची महापालिकेकडे नाही स्वतंत्र व्यवस्था 
  • शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वैतागले; अनेकांना आयुक्‍तांच्या नोटीसा 
  • महापालिकेचे अधिकारी म्हणतात को- मॉर्बिड रुग्णांशी फोनवरून साधला जाईल संपर्क 
  • दिवाळीनिमित्त वाढतेय गर्दी; को- मॉर्बिड रुग्णांना स्वत:ची घ्यावी लागणार काळजी 
  • शिक्षकांची कार्यमुक्‍तीची मागणी कायम; 21 तारखेपासून कामावर हजर न होणाऱ्यांना कारवाईचा इशारा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Municipal Commissioner's orders! 11 days leave from Diwali corona duty for teachers