सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी देणार निष्ठावंतांना संधी 

प्रमोद बोडके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

शेख यांना शरदरत्न पुरस्कार 
सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे काम वाढविण्याबरोबरच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते मेहबूब शेख यांचा "शरदरत्न" पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी मेहबूब शेख यांनी सन्मानाबद्दल ऋण व्यक्त करताना सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाढविण्यासाठी शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली युवकांची फळी मजबूत करून त्या माध्यमातून महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवकांची संख्या वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. 

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी पक्ष उभारण्यासाठी व पक्षाला बळ दिले. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीची संधी देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले. 

aschim-maharashtra-news/solapur/anger-hinganghat-burning-case-260499">हेही वाचा - आम्ही पण हरलो, आता अत्याचाराला हैदराबाद... 
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत युवकची बैठक झाली. सोलापुरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून भाजपचे सरकार असताना शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून भाजप सरकारला धारेवर धरत त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत झाली. इतकेच नव्हे तर शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी पक्षावरची निष्ठा वाढल्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद सुद्धा वाढली. 
हेही वाचा - राज्याच्या तिजोरीत खडखडाट : राज्य सरकारने काढले तीस हजार कोटींचे कर्ज 
शरदचंद्र पवार यांना तरुण कार्यकर्त्यांनी ताकद दिल्यामुळेच पक्ष बळकट झाल्याचे गौरवोद्गारही मेहबूब शेख यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, अहमद मासुलदार, अप्पाराव कोरे, रमीज कारभारी, प्रवीण साबळे, विवेक फुटाणे, रियाज अत्तार, पिंटू जक्का, तुषार जक्का यांच्यासह पक्षाच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur municipality will give NCP loyalists opportunity in elections