कोरोना : सोलापूर त्रिशतकपार; २४ तासात रुग्णांची संख्या ३१ ने वाढली

In Solapur the number of corona patients increased by 31 in 24 hours
In Solapur the number of corona patients increased by 31 in 24 hours
Updated on

सोलापूर :  सोलापूर शहरात आज एकूण 31 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०८ झाली आहे. आज नव्याने आढळलेल्या ३१ जणामध्ये पंधरा पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्याही 21 झाली आहे. 

आज मयत पावलेली पहिली व्यक्ती गुरूनानक परिसरातील 60 वर्षाची साठ वर्षांचे पुरुष आहेत. 11 मे रोजी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान त्यांना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गंभीर स्थितीमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती भवानी पेठ मोदी परिसरातील इंदिरा वसाहत मधील 72 वर्षांचे पुरुष आहेत. 12 मे रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय त्यांना गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आज नव्याने आढळलेल्या 31 रुग्णांमध्ये सोलापुरातील साईबाबा चौकातील दोन पुरुष चार महिला, लष्कर सदर बाझार येथील एक पुरुष एक महिला, शास्त्री नगर येथील दोन पुरुष दोन महिला, नवनाथ नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष व चार महिला, रामलिंग नगर येथील एक पुरुष, कुमार स्वामी नगर येथील एक महिला,  बेगम पेठ येथील एक पुरुष, केशव नगर येथील एक पुरुष, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड येथील एक पुरुष, जुळे सोलापुरातील एक पुरुष, एकता नगर येथील एक पुरुष, इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील एक पुरुष, पोलीस मुख्यालय येथील एक महिला, रंगभवन येथील एक महिला, रविवार पेठेतील एक महिला अशा 31 जणांचा समावेश आहे. अद्यापही 142 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. आज दिवसभरात 129 अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 98 अहवाल निगेटिव्ह असून ३१  अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या बारा जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com